अमरावती | |
जिल्हा | अमरावती |
राज्य | महाराष्ट्र |
दूरध्वनी संकेतांक | ०७२१ |
टपाल संकेतांक | ४४४६०१ |
वाहन संकेतांक | MH-२७ |
अमरावती | |
जिल्हा | अमरावती |
राज्य | महाराष्ट्र |
दूरध्वनी संकेतांक | ०७२१ |
टपाल संकेतांक | ४४४६०१ |
वाहन संकेतांक | MH-२७ |
अमरावती शहर हे अमरावती जिल्हा तसेच अमरावती विभागाचे प्रशासकीय मुख्यालय आहे.
शहर उंचीवर वसलेले असल्यामूळे हवामान थंड आहे. मुबलक प्रमाणात झाडे व शहराच्या परिसरात असणार्या तलावांमुळे पाण्याची मुबलकता आहे. मेळघाट व चिखलदरा परिसर येथुन जवळच आहे. शहराजवळ १० किमी वर पोहरादेवी हे अभयारण्य आहे. शहराला लागुनच डोंगर असल्यामुळे डोंगर कुशीत बसल्यासारखे हे सुंदर शहर मनाला आकर्षीत करते.
अमरावती विद्यापीठ हे शहराच्या पुर्वेस आहे. अतिशय नयनरम्य वातावरणात पर्वत पायथ्याशी हे विद्यापीठ आहे. खूप मोठा व विवीध प्रकारच्या झाडांनी याचा परिसर समृध्द आहे. या विद्यापीठाला आता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ असे नाव देण्यात आले आहे. येथे संत गाडगेबाबा अध्यासन चालवले जाते.
शैक्षणीक दृष्ट्या अमरावती हे विदर्भात फार विद्यार्थी प्रिय ठिकाण आहे. येथे विदर्भ ज्ञान विज्ञान संथेचे कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, शासकिय अभियांत्रीकी महाविद्यालय, शासकिय तंत्रनिकेतन, पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय, विद्याभारती कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, केशरबाई लाहोटी कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, श्री शिवाजी कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, बियाणी कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, तक्षशीला कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, कृषी महाविद्यालय, सिपना अभियांत्रीकी महाविद्यालय , बडनेरा अभियांत्रीकी महाविद्यालय , अशी मोठी यादीच देता येईल. शिक्षणाच्या सोईमुळे अमरावती हे पश्चीम विदर्भाचे मुख्य केन्द्र झाले यात काही नवल नाही. शहराचे एक मोठे आकर्षण म्हणजे श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ . हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शाररीक शिक्षण महाविद्यालय असून संपुर्ण भारतातून मुलं येथे शिक्षणासाठी येतात.
बाजारपेठ
- जोशी मार्केट
- इतवारा बाजार
- अंबा देवी रोड
- तख्तमल इस्टेट
- जवाहर रोड
- शाम चौक
- जयस्तंभ चौक
- गांधी चौक
- खंडेलवाल मार्केट
- सराफा बाजार
- काँटन मार्केट
प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगे बाबा, लोकमान्यांचे नजिकचे सहकारी दादासाहेब खापर्डे, वीर वामनराव जोशी, पुरोगामी विचारवंत, शिक्षणमहर्षी व पहिले केंद्रीय कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख अशा थोर पुरुषांची देणगी महाराष्ट्राला देणारा हा अमरावती जिल्हा.
जिल्ह्यातील ‘चिखलदरा’ हे विदर्भातील एकमेव गिरिस्थान आणि राज्यातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण! संपूर्ण महाराष्ट्रात केवळ याच ठिकाणी कॉफीचे मळे आहेत. चिखलदरा ‘विदर्भाचे नंदनवन’ म्हणून ओळखले जाते. मेळघाटातील व्याघ्र प्रकल्पासाठी प्रसिद्ध असणारा, तसेच वर्हाडी बोलीचे वैशिष्ट्य आवर्जून जपणारा अशीही अमरावतीची प्रमुख वैशिष्ट्ये सांगता येतील.
ऐतिहासिक महत्त्वाचे
अमरावती जिल्ह्याच्या परिसराचा संबंध महाभारताशी जोडला असल्याचे संदर्भ पौराणिक कथा दंतकथांत आढळतात. भगवान श्रीकृष्णाची पत्नी रुक्मिणी ही कुंडिनपूरच्या राजाची कन्या असल्याचा उल्लेख पुराणात आढळतो. हेच गाव आता कौंडिण्यपूर म्हणून ओळखले जाते. गावाजवळील अंबादेवीच्या मंदिरात रुक्मिणी पूजेसाठी आली असताना तिचे श्रीकृष्णाने अपहरण केले अशी कथा सांगितली जाते. श्रीकृष्णाच्या ‘अमर’ या नावावरून अमरावती हे नाव रूढ झाल्याचेही मानले जाते.
अमरावती जिल्ह्याने मौर्य, गोंड, मोगल, मराठे व ब्रिटीश अशा अनेक राजवटी पाहिल्या आहेत. १८५३ पर्यंत निजामाच्या अधिपत्याखाली असणारा हा जिल्हा नंतर इंग्रजांच्या हाती आला. १९५६ साली झालेल्या राज्य पुनर्रचनेनंतर अमरावती मध्य प्रदेशातून महाराष्ट्राकडे म्हणजे मुंबई प्रांताकडे आला. १ मे, १९६० रोजी महाराष्ट्र राज्य स्थापन झाले, तेव्हा अमरावतीला स्वतंत्र जिल्ह्याचे अस्तित्व प्राप्त झाले.
विदर्भातील अमरावती विभागाचे प्रमुख ठिकाण असलेला अमरावती हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा जिल्हा आहे. (आंध्र प्रदेशातही अमरावती नावाचा एक जिल्हा आहे)
भूगोल
अमरावतीच्या उत्तरेला मध्य प्रदेश; पूर्वेला नागपूर व वर्धा; दक्षिणेला यवतमाळ; नैऋत्येला व पश्र्चिमेला अकोला जिल्हा - अशी जिल्ह्यांची रचना आहे. मध्य प्रदेशातील खांडवा व बैतुल हे जिल्हे अमरावतीच्या उत्तर सीमेवर आहेत.
जिल्ह्यातील हवामान विषम व कोरडे आहे. जिल्ह्याची तापमानकक्षा (दैनिक व वार्षिक) खूप मोठी तफावत असलेली आहे. अति कडक उन्हाळा व कडक थंडी अशी स्थिती जिल्ह्यात आढळते. उत्तर-पश्र्चिमेकडील डोंगराळ भागातील हवामान मात्र थंड व आल्हादायक असते. ‘चिखलदरा’ हे स्थान याच भागात आहे.
जिल्ह्याची लोकसंख्या वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे:
लोकसंख्या:- (संदर्भ: जनगणना २००१)
क्र. | तपशील | संख्या |
१ | क्षेत्रफळ | १२,२१० चौ. कि. मी. |
२ | लोकसंख्या एकूण | २६,०७,१६० |
२.१ | पुरुष | १३,४५,६१४ |
२.२ | स्त्रिया | १२,६१,५४६ |
२.३ | ग्रामीण | १७,०७,५८१ |
२.४ | शहरी | ८,९९,५७९ |
३ | स्त्री- पुरुष गुणोत्तर | १०००: ९३८ |
४ | साक्षरता एकूण | ८२.५४% |
४.१ | पुरुष | ८८.९१% |
४.२ | स्त्री | ७५.७३% |
सातपुड्याच्या रांगांमुळे डोंगरदर्या, जंगले अशी उत्तम निसर्गसंपदा असलेला अमरावती जिल्हा विदर्भ भागात महाराष्ट्राच्या उत्तर-पूर्वेला आहे.
जिल्ह्याच्या वायव्येकडील (उत्तर-पश्र्चिम) धारणी आणि चिखलदरा या दोन तालुक्यांनी मिळून बनलेल्या भागास मेळघाट म्हटले जाते. दाट जंगल आणि सातपुडा डोंगर दर्यांचा हा भाग असून सुमारे ४००० चौ. कि.मी. क्षेत्राचा हा मेळघाटचा परिसर आहे. अमरावती शहराजवळचा चांदूर रेल्वे हा भागही टेकड्या, डोंगरउतार असा समुद्रसपाटीपासून ५०० मीटर उंचीवरचा भाग आहे. बाकी सर्व तालुके मात्र पठाराचे, काळ्या सुपीक जमिनीचे आहेत. जिल्ह्यातील प्रामुख्याने मेळघाट भाग दाट जंगलांनी व्यापलेला आहे. धारणी भागात चांगल्या दर्जाचा साग मोठ्या प्रमाणावर आढळतो. तसेच चिखलदरा भागात बांबूची बने आढळतात. तेंदू पानेही या जंगलांत मुबलक प्रमाणात आढळतात.
पूर्णा, वर्धा नदीच्या खोर्यात खूप चांगल्या प्रतीची जमीन आहे. जिल्ह्यातून तापी, पूर्णा, वर्धा, सिपना या मोठ्या नद्या तर कापरा, गाडगा, चुडामण, खोलाट अशा लहान नद्या वाहतात. वर्धा नदीने जिल्ह्याची पूर्व सीमा अधोरेखित केली आहे. तापी नदी जिल्ह्याच्या उत्तर-पश्र्चिम सीमा भागातून वाहते. अंजनगाव-सुर्जी तालुक्यातील शहानूर प्रकल्प (शहानूर नदी), अचलपूर तालुक्यातील चंद्रभागा नदीवरील चंद्रभागा प्रकल्प (बोपापूर) ही जिल्ह्यातील काही महत्त्वाची धरणे होत. वालुकाश्म हे खनिज राज्यातील काही मोजक्याच ठिकाणी सापडते, त्यातील अमरावती हे एक होय.
तालुक्यांची लोकसंख्या व क्षेत्रफळ:-
(संदर्भ: जनगणना २००१)
(संदर्भ: जनगणना २००१)
क्र. | तालुका | क्षेत्रफळ (चौ. कि. मी.) | लोकसंख्या |
१ | धारणी | ८०८.० | १,४७,०८६ |
२ | चिखलदरा | ५७०.९ | ९५,५६१ |
३ | अचलपूर | ६४९.५ | २,५२,५१३ |
४ | चांदूर बाजार | ६९७.० | १,९०,१७९ |
५ | मोर्शी | ८०७.७ | १,७०,८९१ |
६ | वरूड | ७७६.६ | २,११,११३ |
७ | अंजनगाव-सुर्जी | ५०५.३ | १,५०,३८४ |
८ | दर्यापूर | ८२४.१ | १,६२,२३० |
९ | भातकुली | ७१२.० | १,०८,६२३ |
१० | अमरावती | १०१९.७ | ६,७८,१९२ |
११ | तिवसा | ५७०.० | ९८,०७१ |
१२ | नांदगाव-खंडेश्वर | ७८२.० | १,२४,६०४ |
१३ | चांदूर-रेल्वे | ९४०.५ | ९०,६४५ |
१४ | धामणगाव-रेल्वे | ६२३.२ | १,२७,०६८ |
नागरी प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्था
क्र. | तपशील | संख्या | नावे |
१ | महानगरपालिका | ०१ | अमरावती |
२ | नगरपालिका | १० | अंजनगांव-सूर्जी, अचलपूर, मोर्शी, वरूड, दर्यापूर, चांदुर रेल्वे, चांदूर बाजार, धामणगांव, शेंदूरराजा, चिखलदरा. |
३ | जिल्हा परिषद | ०१ | अमरावती |
४ | पंचायत समित्या | १४ | दर्यापूर, अंजनगांव, अचलपूर, चांदूरबाजार, मोर्शी, वरूड, तिवसा, भातकुली, अमरावती, नांदगाव-खंडेश्वर, चांदुररेल्वे, चिखलदरा, धारणी, धामणगांव रेल्वे |
जिल्ह्यात लोकवस्ती असलेली एकूण १६७९ गावे असून ८६६ ग्रामपंचायती आहेत.
क्र. | तालुका | क्षेत्रफळ (चौ. कि. मी.) | लोकसंख्या |
१ | धारणी | ८०८.० | १,४७,०८६ |
२ | चिखलदरा | ५७०.९ | ९५,५६१ |
३ | अचलपूर | ६४९.५ | २,५२,५१३ |
४ | चांदूर बाजार | ६९७.० | १,९०,१७९ |
५ | मोर्शी | ८०७.७ | १,७०,८९१ |
६ | वरूड | ७७६.६ | २,११,११३ |
७ | अंजनगाव-सुर्जी | ५०५.३ | १,५०,३८४ |
८ | दर्यापूर | ८२४.१ | १,६२,२३० |
९ | भातकुली | ७१२.० | १,०८,६२३ |
१० | अमरावती | १०१९.७ | ६,७८,१९२ |
११ | तिवसा | ५७०.० | ९८,०७१ |
१२ | नांदगाव-खंडेश्वर | ७८२.० | १,२४,६०४ |
१३ | चांदूर-रेल्वे | ९४०.५ | ९०,६४५ |
१४ | धामणगाव-रेल्वे | ६२३.२ | १,२७,०६८ |
राजकीय संरचना
लोकसभा मतदारसंघ
अमरावती जिल्ह्यातील बडनेरा, अमरावती, तिवसा, दर्यापूर, मेळघाट, अचलपूर हे सहा विधानसभा मतदारसंघ मिळून अमरावती लोकसभा मतदारसंघ तयार झाला आहे. जिल्ह्यातील उर्वरित धामणगांव रेल्वे, मोर्शी हे दोन विधानसभा मतदारसंघ वर्धा लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहेत.
विधानसभा मतदारसंघ : (८)
अमरावती, बडनेरा, तिवसा, दर्यापूर, मेळघाट, अचलपूर, मोर्शी, धामणगाव - रेल्वे. जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे ५९ मतदारसंघ असून पंचायत समितीचे ११८ मतदारसंघ आहेत.

शेती
विदर्भातील अन्य जिल्ह्यांप्रमाणेच हा जिल्हा कृषीप्रधान असून लागवडीखालील सर्वाधिक क्षेत्रावर अन्नधान्याची लागवड केली जाते. ज्वारी हे जिल्ह्यातील एक प्रमुख पीक आहे. जिल्ह्यातील अन्नधान्य पिकांखालील क्षेत्रापैकी निम्मे क्षेत्र ज्वारीखाली आहे.
कापूस हे जिल्ह्यातील महत्त्वाचे व्यापारी पीक होय. जिल्ह्यात डोंगराळ भाग वगळता इतर मैदानी प्रदेशात काळी-सुपिक माती मोठ्या प्रमाणावर आढळते. कापूस या पिकासाठी अगदी अनुकूल असलेली ही माती ‘रेगूर मृदा’ किंवा ‘कापसाची मृदा’ म्हणून संबोधली जाते. कापसाखलील क्षेत्र व कापसाचे उत्पादन या दोहोंचा विचार करता हा जिल्हा राज्यात नेहमीच आघाडीवर (पहिल्या तीन जिल्ह्यांत) असतो.
जिल्ह्यातील इतर पिके - तूर, गहू, हरभरा, ऊस, मिरची, संत्री, मोसंबी व विड्याची पाने ही आहेत. नागपूरसह अमरावती जिल्हाही संत्र्यांसाठी प्रसिद्ध असून संत्र्यांच्या उत्पादनात राज्यात आघाडीवर आहे.
जिल्ह्यातील धारणी व चिखलदरा या भागातील जंगलांमध्ये चांगल्या प्रतीचे बांबू मोठ्या प्रमाणावर आढळतात. येथे अलीकडच्या काळात बांबूची लागवड जाणीवपूर्वक केली जाते. राज्यात फक्त चिखलदरा येथेच कॉफीचे मळे आढळतात.

उद्योग
उत्तम प्रतीचा कापूस असल्याने हातमाग, यंत्रमाग, सूत गिरण्या, जिनिंग आणि प्रेसिंग मिल हा व्यवसाय जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात केला जातो. सतरंजी, घोंगड्या विणण्याचा व्यवसाय जिल्ह्यात चालतो.
जिल्ह्यात देवगाव नागपूर (ता. चांदूर रेल्वे) व रामनगर येथे दोन सहकारी साखर कारखाने आहेत,

तसेच अमरावती, अंजनगाव, वरूड, अचलपूर, दर्यापूर, मोर्शी येथे औद्योगिक वसाहती आहेत. सातुर्णा येथे सहकारी औद्योगिक वसाहत आहे. अमरावती व मोझरी येथे औषधांचे कारखाने असून, अमरावती येथेच रासायनिक खते व प्लॅस्टिकची उत्पादने उत्पादित केली जातात.
साखर कारखाने
क्र. | नाव | गाव, तालुका |
१ | शेतकरी सहकारी साखर कारखाना | देवगाव, चांदूर - रेल्वे |
२ | श्री कोंडेश्र्वर सहकारी साखर कारखाना | रामनगर (फुलगाव) |
दळणवळण
रेल्वे - मुंबई-भूसावळ-नागपूर-कोलकाता, मूर्तिजापूर-अचलपूर, खांडवा-अकोला-पूर्णा, व बडनेरा-अमरावती हे लोहमार्ग जिल्ह्यातून जातात. या लोहमार्गांमुळे अमरावती हे शहर मुंबई, जळगाव, नागपूर, कोलकाता, दिल्ली, चेन्नई या मोठ्या शहरांना जोडले गेले आहे.
रस्ते - हाजीरा-धुळे-कोलकाता हा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ या जिल्ह्यातून जातो. या दळणवळणाच्या साधनांमुळे अमरावतीमधील शेतीमाल व इतर उद्योगांना बाजारपेठ मिळाली आहे.

अमरावतीचे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरापासूनचे अंदाजे अंतर
...पासून | अंतर(कि.मी.) |
मुंबई | ७०४ |
नागपूर | १५५ |
औरंगाबाद | ३७४ |
रत्नागिरी | ८८६ |
पुणे | ५७३ |
संद़र्भ- महाराष्ट्र मार्गदर्शक नकाशा
समर्थ उद्योग, औरंगाबाद.
समर्थ उद्योग, औरंगाबाद.
पर्यटन
व्याघ्र संवर्धनासाठी प्रसिद्ध असा मेळघाट व्याघ्र प्रकल्प जिल्ह्यात १६७७ चौ. कि.मी. वर पसरलेला आहे. पट्टेरी वाघांची संख्या कमी होत चालल्यामुळे १९७४ साली मेळघाट हे वाघांसाठीचे विशेष असे राखीव जंगल म्हणून घोषित करण्यात आले.४१ सस्तन प्राण्यांच्या प्रजाती, पक्ष्यांच्या २५० प्रजाती, माशाच्या २४ प्रजाती, तर सरपटणार्या प्राण्यांच्या १६० प्रजातींनी मेळघाटचे जंगल समृद्ध आहे. त्यांचे जतन व वाढ व्हावी ह्या दृष्टीने वनविभाग जनजागृती कार्यक्रम हाती घेत आहे. झाडांच्या ७०० प्रजाती आपणास येथे पाहायला मिळतात. चांगल्या प्रतीचा साग, बांबू, मोह अशा मोठ्या वृक्षांनी आणि हिरडा, बेहडा, मुसळी, अशा औषधी वृक्षांनी मेळघाटचे जंगल नटले आहे.
जंगलतोड, शिकारीला बंदी घालून संरक्षित वनक्षेत्र म्हणून कडक सुरक्षा व्यवस्था देऊन प्राणी आणि निसर्ग वाचवण्याचा प्रयत्न येथे केला जातो.व्याघ्र संवर्धनासाठी प्रसिद्ध असा मेळघाट व्याघ्र प्रकल्प जिल्ह्यात १६७७ चौ. कि.मी. वर पसरलेला आहे. पट्टेरी वाघांची संख्या कमी होत चालल्यामुळे १९७४ साली मेळघाट हे वाघांसाठीचे विशेष असे राखीव जंगल म्हणून घोषित करण्यात आले.४१ सस्तन प्राण्यांच्या प्रजाती, पक्ष्यांच्या २५० प्रजाती, माशाच्या २४ प्रजाती, तर सरपटणार्या प्राण्यांच्या १६० प्रजातींनी मेळघाटचे जंगल समृद्ध आहे. त्यांचे जतन व वाढ व्हावी ह्या दृष्टीने वनविभाग जनजागृती कार्यक्रम हाती घेत आहे. झाडांच्या ७०० प्रजाती आपणास येथे पाहायला मिळतात. चांगल्या प्रतीचा साग, बांबू, मोह अशा मोठ्या वृक्षांनी आणि हिरडा, बेहडा, मुसळी, अशा औषधी वृक्षांनी मेळघाटचे जंगल नटले आहे.
अमरावती शहरात अंबादेवीचे मोठे मंदिर आहे त्याजवळच श्री एकवीरा देवीचेही मंदिर आहे. अंबादेवीचे मंदिर तत्कालीन अस्पृशांना खुले व्हावे म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख यांनी सत्याग्रह केला होता. (१९२८)
श्री एकवीरा देवीच्या मंदिराची स्थापना सुमारे ३७५ वर्षांपूर्वी (१७ व्या शतकात) श्री जनार्दन स्वामी यांनी केली. पूर्वी घनदाट जंगल असलेल्या या परिसरात जनार्दन स्वामींनी एकवीरा देवीची आयुष्यभर आराधना केली. या मंदिराच्या परिसरात त्यांनी समाधी घेतल्याचे इतिहासकार सांगतात.
जिल्ह्यातील चिखलदरा हे एक थंड हवेचे ठिकाण पर्यटन स्थळ म्हणून विकसित झाले आहे. विदर्भातील हे डोंगराळ भागातील निसर्गरम्य असे एकमेव स्थान असून याला विदर्भाचे नंदनवनही म्हटले जाते. हे सातपुडा रांगेतील उंचावरील ठिकाण असून येथून जवळच गाविलगड हा सुमारे १४ व्या शतकात बांधलेला किल्ला आहे. चिखलदार्याजवळच बैराट हे सातपुडा रांगेतील सर्वांत उंच शिखर आहे. जिल्ह्यातील इतर ठिकाणांप्रमाणेच चिखलदर्याचा संबंध थेट महाभारताशी जोडलेला आहे. भीमाने कीचकाचा वध येथे केला, म्हणून हे ठिकाण प्रथम किचकदरा होते. अपभ्रंश होत होत याचे नाव चिखलदरा झाल्याचे मानले जाते. येथेच भीमाच्या नावाचे कुंडही आहे. या परिसरात कोरकू, गोंड,माडिया हे आदिवासी मोठ्या प्रमाणावर राहत असून, ते दरवर्षी शासनाच्या सहकार्याने पर्यटन उत्सव साजरा करतात. आदिवासी जीवनाची माहिती सांगणारे वस्तुसंग्रहालय, शक्कर तलाव, शिवमंदिर अशी अनेक ठिकाणे प्रेक्षणीय आहेत.
भातकुली तालुक्यात ऋणमोचन या ठिकाणी पूर्णा नदीकाठी मुद्गलेश्वराचे प्रसिद्ध मंदिर आहे. तसेच भातकुली हे जैन धर्मियांचेही श्रद्धास्थान आहे.
वर्धा नदीकाठचे कौंडिण्यपूर हे ठिकाण प्राचीन अवशेषांसाठी विशेष प्रसिद्ध आहे. येथील विठ्ठल-रखुमाई मंदिरही प्रसिद्ध असून या स्थानाला विदर्भातील पंढरपूर म्हणतात.
मोर्शी तालुक्यात सालबर्डी येथील गुहेतील महादेवाचे मंदिर प्रसिद्ध असून याच तालुक्यातील रिद्धपूर येथे महानुभव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी यांचे गुरू श्री गोविंदप‘भू यांची समाधी आहे. श्री गोविंदप्रभूंचे वास्तव्य असलेले रिद्धपूर महानुभव पंथीयांचे श्रद्धास्थान आहे.
सामाजिक / विविध
जिल्ह्यातील मेळघाट परिसरात चिखलदरा व धारणी या तालुक्यांत आदिवासी मोठ्या संख्येने राहत असून त्यातील ८० टक्के लोकसंख्या कोरकू आदिवासींची आहे. तसेच या परिसरात कोलाम, बसोडे, गोंड, माडिया-गोंड, ढाणका यांसारख्या आदिवासी जमातींचेदेखील वास्तव्य आहे. या आदिवासींची वैशिष्टपूर्ण जीवनशैली जिल्ह्यात पाहावयास मिळते. घराच्या मागील बाजूने बाहेर पडण्याची पद्धती या लोकांमध्ये आढळते. भात हे त्यांचे मुख्य अन्न होय. भाताला ते ‘बाबा चावळी’ असे म्हणतात. ‘खेकादेव’ व ‘मुठबा’ हे त्यांचे प्रमुख देव होत. कोरकू जमातीच्या पुजार्याला ‘भुमका’ या नावाने ओळखले जाते. कोरकू जमातीचे लोक विवाहप्रसंगी ‘बिहावू’ हे नृत्य करतात. ‘ढेमसा’ हे गोंडांचे काठीनृत्य, ‘गावबांधणी’ हे कोलाम जमातीचे पारंपरिक नृत्य व माडियांचे ‘रेला’ हे नृत्य ही येथील सांस्कृतिक वैशिष्ट्ये आजही जपलेली आढळतात.
शिक्षण - अमरावती जिल्ह्याच्या शैक्षिणिक, सामाजिक व सांस्कृतिक जडण-घडणीत मौल्यवान योगदान देणारे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ ही विदर्भातील एक महत्त्वाची शिक्षण संस्था म्हणून गणली जाते. १ मे, १९८३ रोजी अमरावती विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा व वाशिम या जिल्ह्यांतील सुमारे १८० महाविद्यालये व २२ पद्व्युत्तर शिक्षण विभाग अमरावती विद्यापीठाशी संलग्न आहेत. हा जिल्हा तंत्रशिक्षणासाठी प्रसिद्ध असून, येथे ३ अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. जिल्ह्यात ४ वैद्यकीय महाविद्यालये असून डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयदेखील आहे. अमरावती जिल्ह्यात शासनाने एक कृषी संशोधन केंद्र १९५४-५५ पासून सुरू केले आहे.
अन्य माहिती - श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळामुळे शारीरिक शिक्षणासाठी जिल्हा विशेष प्रसिद्ध आहे. येथे असलेल्या सोयी सुविधांची जगातील सर्वांत चांगल्या सुविधांशी तुलना करण्यात येते. अमरावती येथे १९२६ मध्ये डॉ. पंजाबराव देशमुख यांनी सर्व जाति-धर्मांच्या विद्यार्थ्यांसाठी श्रद्धानंद छात्रालय स्थापन केले व बहुजन समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला चालना दिली. त्यांनीच १९३२ मध्ये स्थापन केलेल्या श्रीशिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यही अमरावती येथून चालते. डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांनी १९४६ मध्ये कुष्ठरोग्यांसाठी स्थापन केलेली तपोवन-जगदंबा कुष्ठधाम ही संस्था अमरावती येथे आहे.
कारंज्याची बहिरामाची जत्रा प्रसिद्ध आहे, ‘शाहदौल रहिमान शाह गाझी’ चा उरुस हे अचलपूर तालुक्याचे वैशिष्ट्य आहे. डिसेंबर १३ ते २० मधील शेगावची गाडगेबाबांची जत्राही प्रसिद्ध आहे.

विशेष व्यक्ती
प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील माधान या गावी जुलै, १८८१ मध्ये झाला. अवघे ९ महिने वय असताना ते पूर्ण अंध झाले. पण तरीही केवळ ३४ वर्षांचे आयुष्य लाभलेले संत गुलाबराव ‘संपूर्ण ज्ञानी’ बनले. त्यांनी विविध विषयांवर एकूण १३३ पुस्तके (सुमारे ६००० पाने) लिहिली. तसेच त्यांनी एकूण १३० टीकात्मक काव्येही (पद्यरचना-सुमारे २५००० ओव्या) रचली. वेदांत, उपनिषदे, आत्मज्ञान, प्राचीन संत साहित्य, ध्यान-योग-मधुराभक्ती, आयुर्वेद, डार्विन-स्पेन्सर आदी शास्त्रज्ञांचे सिद्धांत - हे त्यांच्या अभ्यासाचे, चिंतनाचे व लेखनाचे विषय होत. ‘मधुराद्वैत’ (मधुरा भक्ती व अद्वैत विचार यांचा समन्वय) हा नवा विचार त्यांनी भक्तांना दिला. ते स्वत:ला ‘संत ज्ञानेश्र्वरांची कन्या’ मानत असत. हे व्यक्तिमत्त्व म्हणजे १९-२० व्या शतकातील ‘चमत्कारच’!
महाराष्ट्रात गावोगावी पायी फिरून सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणारे संत गाडगे महाराज यांचे मूळ गाव (शेंडगांव, ता. अंजनगांव-सूर्जी) ह्याच जिल्ह्यात आहे. हेच संत गाडगेबाबांचे जन्मगाव होय.
राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाणारे तुकडोजी महाराज ह्यांचे यावली हे जन्मगाव आहे. मोझरी येथे संत तुकडोजी महाराजांनी १९३५ मध्ये गुरुकुंज आश्रम स्थापन केला. मोझरी येथेच महाराजांचे समाधी स्थान आहे. त्यांचा हा आश्रम जनसेवेचे एक केंद्रच असून लोककल्याणासाठी तुकडोजी महाराजांनी येथे अनेक उपक्रम राबविले. राष्ट्रकार्यासाठी आपल्या कीर्तनांद्वारे जनजागृती व ग्रामसुधार अभियान ही त्यांची काही कार्ये होत. गावाचा विकास कसा करावा यासाठी ‘ग्रामगीता’ ह्या ग्रथाचे त्यांनी लेखन केले. खंजरी हे वाद्य विदर्भात श्री तुकडोजी महाराजांमुळेच प्रसिद्ध झाले.
जुने राजकीय नेते, शिक्षण क्षेत्रात विशेष कामगिरी केलेले आणि पं. नेहरू पंतप्रधान असताना मंत्री मंडळात कृषी खाते सांभाळणारे डॉ.पंजाबराव देशमुख हे अमरावती जिल्ह्यातील पापळ गावी जन्मले होते.
थोर स्वातंत्र्यसैनिक व नाटककार वीर वामनराव उर्फ दादा जोशी हे अमरावती जिल्ह्यातलेच होत. स्वातंत्र्यपूर्व काळात वामनरावांनी क्रांतिकार्यात भाग घेतला. सुमारे १० वर्षे त्यांनी तुरुंगवास भोगला, नंतर ते महात्मा गांधीजींचे अनुयायी बनले. त्या काळात ‘राक्षसी महत्त्वाकांक्षा’, ‘रणदुंदुभी’ या रुपकात्मक नाटकांच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रात जनजागृती करण्याचा यशस्वी प्रयत्न केला.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांनी कुष्ठरोग्यांची सेवा करण्याचे महत्कार्य (१९५० दरम्यान) अमरावती जिल्ह्यात केले. डॉ. पटवर्धन हे स्वातंत्र्यलढ्यातही सहभागी होते. स्वातंत्र्यानंतर त्यांनी ‘जगदंबा कुष्ठरोग निर्मूलन चळवळ’ या माध्यमातून त्यांनी उपचारांचे व जनजागृतीचे कार्य केले. केंद्र शासनाने त्यांचा ‘पद्मश्री’ हा किताब देऊन गौरव केला.
ज्येष्ठ ऐतिहासिक व प्रादेशिक कादंबरीकार गो.नी. (गोपाळ नीळकंठ) दांडेकर यांचा जन्म व प्राथमिक शिक्षण परतवाडा (तालुका अचलपूर) येथे झाले होते.
भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती मा. प्रतिभाताई पाटील ह्यांचे अमरावती येथे निवासस्थान आहे.

No comments:
Post a Comment