Tuesday, November 29, 2011

अहमदनगर

अहमदनगर शहर हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील सीना नदीच्या काठावर वसलेले आहे जे पुण्यापासून ईशान्येकडे साधारणपणे १२० कि.मी. वर आहे. हे शहर अहमदनगर जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.

 

गुणक: 19°05′N 74°44′E / 19.08, 74.73
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची
८५.१४ km² (३३ sq mi)
• ६५६.५४ m (२,१५४ ft)
जिल्हाअहमदनगर
लोकसंख्या
घनता
लिंग गुणोत्तर
साक्षरता
३,०७,४५५[१] (२००१)
• ३,६११/km² (९,३५२/sq mi)
१.०८
७७.५२
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४,१४,००१
• +0241
• महा-१६

इतिहास

१५ व्या शतकाच्या शेवटी, इ.स. १४८६ मध्ये तत्कालीन बहामनी राज्याचे पाच तुकडे झाले. त्यामधून फुटून निघालेल्या मलिक अहमदशहा बहिरी या निजामशहाने मे, इ.स. १४९० मध्ये सीना नदीकाठी पूर्वीच्या भिंगार शहराजवळ नवीन शहर वसवण्यास सुरुवात केली. याच्या नावावरूनच या शहराला अहमदनगर असे नाव पडले. १४९४ मध्ये शहर रचना पूर्ण होऊन अहमदनगर निजामशहाची राजधानी बनले. या शहराची तुलना त्या काळी कैरो, बगदाद या समृद्ध शहरांशी केली जात असे. अहमदशहा, बुर्‍हाणशहा, सुलताना चांदबिबी यांची कारकीर्द असणारी निजामशाही येथे १६३६ पर्यंत टिकली.मोगल बादशहा शाहजहान ने इ.स.१६३६ मध्ये अहमदनगर काबीज केले. इ.स. १७५९ साली पेशव्यांनी अहमदनगरवर ताबा मिळवला तर १८१७ रोजी ब्रिटिशांनी अहमदनगरवर विजय मिळवला. शहरात अहमदनगरचा किल्ला, रेणुकामाता मंदिर (केडगांव) व चांदबीबी महल अशी अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत. या शहराला नगर या नावानेसुद्धा ओळखतात.
मराठ्यांच्या कर्तुत्वाचा उदय ज्यावेळी झाला त्यात प्रमुख घराण्यांपैकी विठोजी भोसले, मालोजी राजे भोसले, लखुजी जाधवराव निंबाळकर पवार, बाजी कदमराव हे निजामशाहीचा चौथा सुलतान मुर्तझा निजामशाह आणि पुढे मलिक अंबर ह्याच्या पदरी सेवेत होते. देवळाली प्रवरा येथील सरदार बाजी कदमराव ह्यांना साल्हेर आणि मुल्हेर हे किल्ले, किल्यावर फितवा करून मिळू दिल्या बद्दल साक्री आणि रुई ही गावे दौलताबाद ( किल्ले देवगिरी ) वरून इ.स. १५८० साली इनाम मिळाली होती. पुढे विजापुरकारांशी लढताना बाजी कदमांचा बंकापुर ( कर्नाटक ) येथे मृत्यू झाला. आजही ह्यांचे वंशज हे देवळाली प्रवरा येथे आहेत. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेवेत हे घराणे आले. खंडेराव कदम आणि बाजी (तिसरे ) हे शिवाजी महाराजांचे अत्यंत विश्वासू सरदार होते. ह्यांच्या कडे किल्ले राजगडची तट सरनौबती होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेत तामिळनाडू येथील वली गंडापुराम जिंकल्यावर येथील भुईकोट किल्ल्याची किल्लेदारी कदमांकडे होती. छत्रपती राजाराम महाराजांच्या जिंजी मोहिमेतही कदमांनी आपले पूर्ण योगदान स्वराज्यासाठी अर्पण केले. पानिपतच्या लढाईत ह्या घरातील सात पुरुषांनी आपला देह हिंदू धर्म रक्ष्यण्यासाठी अर्पण केलेला आहे. आज हि कदमांकडे पारंपारिक आणि दुर्मिळ अशी जुनी शस्रे जपलेली आहेत. ह्यात धोप तलवारी, गूर्ज, कट्यारी, धाली, बिचवा, हस्तिदंती गुप्त्या, भाले, शिवकालीन शिवराया आणि इतर ऐतिहासिक साधने उपलब्ध आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा हे नगर जिल्ह्यातील पहिली नगरपालिका असलेले शहर आहे. देवळाली प्रवरा नगरपालिकेस महामाहीन राष्टपती प्रतिभा पाटील ह्यांच्या हस्ते 'राष्ट्रीय भूजल पुरस्कार' मिळालेला आहे. हा पुरस्कार पंतप्रधान मा. मनमोहन सिंग , मा. कृषिमंत्री शरद पवार ह्यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष श्री मुरलीधर कदम ह्यांनी स्वीकारला आहे. महत्वाचे म्हणजे देशातील फ़क़्त ह्या एकाच नगरपालिकेला हा सन्मान मिळालेला आहे.

[संपादन] भूगोल

अहमदनगरचे जगाच्या नकाशावरचे स्थान १९.०८° उत्तर अक्षांश, ७४.७३° पूर्व रेखांश असे आहे व समुद्रसपाटीपासून उंची ६४९ मीटर आहे.

[संपादन] प्रसिद्ध व्यक्ती

[संपादन] वाहतूक व्यवस्था

मुंबई - विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्ग २२२ अहमदनगर शहरातून जातो. अहमदनगर हे पुणे, औरंगाबाद, सोलापूर, नासिक, बीड या महाराष्ट्रातील प्रमुख शहरांशी राज्य महामार्गांनी जोडले गेले आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस अहमदनगरला जाण्यासाठी सोईस्कर आहेत.
दौंड-मनमाड लोहमार्गावरील अहमदनगर हे महत्त्वाचे स्थानक आहे. येथून जाणा-‍या सर्व प्रवासी रेल्वेगाड्या अहमदनगरला थांबतात. अहमदनगरचे रेल्वे वेळापत्रक येथे पहा.[१]

[संपादन] पर्यटन स्थळे

  • सारे जहान से अच्छा - पेन्सील चित्र - अहमदनगर चे प्रसिद्ध चित्रकार श्री. प्रमोद कांबळे यांनी भारताच्या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये भारतातील नामवंत ५०० महान व्यक्तींची चित्रे ६५ फुट X १७ फुट अशा एका मोठ्ठ्या भिंतीवर काढली आहेत. केवळ पेन्सिलीच्या सहाय्याने इ.स. १९९७ साली काही महिन्यामध्ये त्यांनी हे जगातील सर्वांत मोठे पेन्सिल चित्र पूर्ण केले.
  • विशाल गणपती मंदिर - हे नगरचे ग्रामदैवत म्हणून प्रसिद्ध असलेले मंदिर अहमदनगरच्या माळीवाडा भागात आहे.
  • रेणुकामाता मंदिर (केडगांव) - हे मंदिर केडगाव येथे आहे. ते अहमदनगर रेल्वेस्थानकापासून साधारणपणे ३ किलोमीटरवर आणि अहमदनगर बसस्थानकापासून सुमारे ५ किलोमीटरवर आहे.
  • भुईकोट किल्ला - इ.स. १९४२ मध्ये येथे भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांना इंग्रजांनी कैदेत ठेवले होते. तेव्हा त्यांनी "डिस्कव्हरी ऑफ इंडिया" हे पुस्तक लिहिले.
  • सिद्धटेक - येथील सिद्धिविनायक मंदिर हे अष्टविनायक मंदीरपैकी एक आहे.
  • शिर्डी - हे ठिकाण साईबाबा मंदिरासाठी प्रसिद्ध आहे.
  • शनी शिंगणापूर - येथे शनीचे सुप्रसिद्ध मंदिर आहे. येथे कुठल्याही घराला आणि बँकांनासुद्धा कुलपे नाहीत. शनिदेव चोरांपासून गावाचे रक्षण करतो अशी स्थानिक लोकांची भावना आहे.
  • हरिश्चंद्रगड - एक ऐतिहासिक किल्ला. हा नगरपासून अंदाजे १२५ किलोमीटर अंतरावर आहे. सुप्रसिद्ध कोकण कडा येथेच आहे

No comments: