अकोला जिल्हा महाराष्ट्राच्या पूर्व भागात आहे.या जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र अकोला हे आहे. जुलै १, इ.स. १९९८ रोजी महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले. त्यामुळे अकोला व वाशीम हे दोन नवे जिल्हे निर्माण झाले.जिल्ह्याच्या सीमा उत्तरेस व पुर्वेस अमरावती जिल्हा, दक्षिणेस वाशीम जिल्हा तर पश्चिमेस बुलढाणा जिल्हा आहे
अकोला जिल्ह्यातील बहुसंख्य लोक शेतीवर अवलंबून आहेत असे असले तरी तेवढेच त्याचे वैशिष्ट्य नाही. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ ह्या अकोल्यातील महत्त्वाच्या संस्था आणि त्याबरोबरच महान इथं असलेलं महाराष्ट्रातील पहिले कृषी-पर्यटन केंद्र हेही फार महत्त्वाचे. नरनाळा किल्ला आणि तेथील वन्यजीव अभयारण्य ह्या तर आहेतच अकोल्याच्या लक्षणीय गोष्टी. संत गाडगे बाबा यांचे इथले काम आणि त्यांचा आश्रम कोण विसरेल!
ऐतिहासिक महत्त्वाचे : -
अकोला हा विदर्भातील जिल्हा आहे. निजामशाहीच्या काळात हैद्राबाद संस्थानमध्ये समाविष्ट असणारे अकोला हे शहर ब्रिटिश काळात-१९व्या शतकात- बेरार प्रांतात आले. अकोला जिल्ह्यातील आकोट येथे ब्रिटिशांची नागपूरकर भोसल्यांशी लढाई झाली होती. जुन्या किल्ल्यांचे अवशेष आजही अकोल्यात दिसतात. असदगड, नरनाळा हे त्यापैकीच होत. कोणत्याही गावाच्या नावाशी एखादी घटना, कथा-दंतकथा किंवा एखादी व्यक्ती जोडलेली असते. अकोला या शहराशीदेखील अकोलसिंग नावाच्या रजपूत सरदाराचा संबंध आल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो. त्यानेच हे शहर वसविल्याचे सांगितले जाते व त्याच्या नावावरूनच शहराचे नाव अकोला ठेवण्यात आले.
पूर्वी मध्य प्रदेशमध्ये मोडणारा हा जिल्हा १९५६ साली मुंबई प्रांतात सामील करून घेण्यात आला व त्यानंतर १९६० मध्ये महाराष्ट्राच्या स्थापनेबरोबरच अकोला जिल्ह्याला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा मिळाला. १ जुलै, १९९८ रोजी अकोला जिल्हा विभागला जाऊन वाशिम जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली

महाराष्ट्र राज्याच्या अकोला जिल्हाचे स्थान | |
राज्य | महाराष्ट्र, भारत |
---|---|
विभागाचे नाव | अमरावती |
मुख्यालय | अकोला |
तालुके | १.अकोट, २. अकोला,३. तेल्हारा,४.पातूर, ५.बार्शीटाकळी, ६.बाळापुर, ७.मुर्तीजापुर |
क्षेत्रफळ | ५४३१ कि.मी.² |
लोकसंख्या | १६,३०,२३९ (२००१) |
लोकसंख्या घनता | ३००.८/किमी² |
शहरी लोकसंख्या | ३८.४९ |
साक्षरता दर | ८१.४१ |
लिंग गुणोत्तर | ९३८ ♂/♀ |
जिल्हाधिकारी | परिमल सिंग |
लोकसभा मतदारसंघ | १.अकोला (लोकसभा मतदारसंघ) |
विधानसभा मतदारसंघ | १.अकोला पूर्व,२.अकोला पश्चिम,३.अकोट, ४.बाळापूर, ५.मुर्तिजापूर |
खासदार | संजय धोत्रे |
संकेतस्थळ |

भूगोल :-
हा जिल्हा वाशिम (दक्षिणेला), अमरावती (उत्तरेला व पूर्वेला), बुलढाणा (पश्र्चिमेला) या जिल्ह्यांशेजारी येतो.
जिल्ह्याचे हवामान विषम व कोरडे आहे. म्हणजे उच्चतम व नीचतम तापमानातील फरक येथे जास्त असतो. जिल्ह्यात पूर्णा ही मुख्य नदी आहे. काटेपूर्णा, मोर्णा, मन व उमा ह्या तिच्या उपनद्या आहेत. काटेपूर्णा ही पूर्णेची सर्वांत मोठी उपनदी आहे.
काटेपूर्णा नदीवर बार्शी - टाकळी तालुक्यात एक सिंचन प्रकल्प आहे. तेल्हारा तालुक्यात बारी-भैरवगड येथे असलेला ‘वान’ प्रकल्प हा जिल्ह्यातील सर्वांत मोठा जलसिंचन प्रकल्प असून ह्या प्रकल्पाचा प्रभाव फक्त अकोला जिल्ह्यापुरताच सीमीत नाही, तर त्याचा लाभ यवतमाळ जिल्ह्यातील शेतीलाही होतो. अर्थात ह्या प्रकल्पांखेरीज जिल्ह्यात विहीरींच्या माध्यमातूनही सिंचनाच्या गरजा भागवल्या जातात.

क्र | तपशील | संख्या |
१ | क्षेत्रफळ | ५,४२९ चौ. कि. मी. |
२ | लोकसंख्या | १६,३०,२३९ |
२.१ | पुरुष | ८,४१,२५३ |
२.२ | स्त्रिया | ७,८८,९८६ |
२.३ | ग्रामीण | १०,०२,७४२ |
२.४ | शहरी | ६,२७,४९७ |
३ | स्त्री- पुरुष गुणोत्तर | १०००:९३८ |
४ | साक्षरता एकूण | ८१.४१% |
४.१ | पुरुष | ८८.९१% |
४.२ | स्त्री | ७३.४३% |
प्रशासन :-
तालुक्यांची लोकसंख्या व क्षेत्रफळ :( संदर्भ जनगणना २००१)या जिल्ह्यात ७ तालुके असून त्यांची सूची पुढीलप्रमाणे -
क्र | तालुका | क्षेत्रफळ (चौ.कि.मी.) | लोकसंख्या |
१ | तेल्हारा | ५८४.१० | १,५६,७७६ |
२ | अकोट | ८०९.३४ | २,३२,४९३ |
३ | बाळापूर | ६७४.४६ | १,६९,१५९ |
४ | अकोला | १,१३४.१३ | ६,५६,७४६ |
५ | मूर्तिजापूर | ८०४.५० | १,६१,६६१ |
६ | पातूर | ७०९.१८ | १,२०,६८४ |
७ | बार्शी- टाकळी | ७७७.०० | १,३२,७२० |
क्र | तपशील | संख्या | नावे |
१ | महानगरपालिका | ०१ | अकोला |
२ | नगरपालिका | ०५ | आकोट, मुर्तिझापूर, बाळापूर, तेल्लारा, पातूर |
३ | पंचायत समित्या | ०७ | अकोला, बार्शी- टाकळी,आकोट,तेल्लारा, बाळापूर,पातूर, मुर्तिझापूर |
जिल्ह्यात ग्रामीण पंचायती ५४१, आणि गावं ८६२.
राजकीय संरचना :-
लोकसभा मतदारसंघ (१) - जिल्हातील सर्व (५) विधानसभा मतदारसंघ व वाशिम जिल्ह्यातील रिसोड विधानसभा मतदारसंघ मिळून अकोला लोकसभा मतदारसंघ तयार झाला आहे.
विधानसभा मतदारसंघ (५) - आकोट, बाळापूर, अकोला पश्चिम, अकोला पूर्व, मुर्तिझापूर अकोला जिल्हा परिषदेचे हे ५२ मतदारसंघ असून, पंचायत समितीचे १०४ मतदारसंघ आहेत.
शेती :-
अकोला जिल्ह्याचा लौकिक वाढवणारे, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ हे विदर्भातील एकमेव कृषी संशोधन केंद्र आणि कृषी विद्यापीठ असून, त्याची स्थापना १९६९ साली झाली. पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना विदर्भातील ज्येष्ठ राजकीय नेते डॉ. पंजाबराव देशमुख हे त्यांच्या मंत्रिमंडळातील कृषी मंत्री होते. त्यामुळे योग्य ते औचित्य साधून त्यांचेच नाव विद्यापीठाला देण्यात आले.
जिल्ह्याची कृषिप्रधान अर्थव्यवस्था लक्षात घेता, पंजाबराव कृषी विद्यापीठामध्ये ज्वारी, गहू, तूर, कापूस व संत्रे या पिकांसंबंधी संशोधन करण्यात येते. तसेच पशुपालन, फळबाग लागवड व पिकांवरील रोगराई हे देखील संशोधनाचे विषय आहेत. या विद्यापीठाच्या माध्यमातून कृषी अभियांत्रिकी, कृषी तंत्रज्ञान, जमीन व जलसंधारण, जलसिंचन, कृषी प्रक्रिया उद्योग या विषयांबाबतचे प्रशिक्षण दिले जाते.
महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) चे मुख्यालय अकोला येथे आहे. एप्रिल, १९७६ रोजी या संस्थेची स्थापना अकोल्यात करण्यात आली. अन्नधान्य व इतर बी-बियाणांबाबत संशोधन, विकास व निर्मितीचे कार्य ह्या संस्थेच्या माध्यमातून केले जाते. अनुकूल हवामान व मृदा (जमीन) यांमुळे हा जिल्हा कापूस उत्पादनात नेहमीच अग्रेसर असतो. कापूस हेच जिल्ह्यातील प्रमुख नगदी पीक आहे. कापसाच्या लागवडीखालील क्षेत्र एकूण लागवडीखालील क्षेत्राच्या ४०% एवढे आहे. ज्वारी, मूग, तूर ही जिल्ह्यातील खरीपाची प्रमुख पिके असून, गहू, हरभरा ही प्रमुख रब्बी पिके आहेत. खरीप ज्वारीच्या उत्पादनात अकोला महाराष्ट्रात आघाडीवर असणार्या जिल्ह्यांपैकी एक आहे. संत्री हेदेखील जिल्ह्यातील महत्त्वाचे बागायती पीक असून मिरची व ऊसाचे पीकही ह्या जिल्ह्यात घेतले जाते.
उद्योग :-
जिल्ह्यात शेतीबरोबरच नव्याने औद्योगिक वसाहती आल्याने इतर व्यवसायाच्या संधीही येत आहेत. जिल्ह्यात अकोला, आकोट, बाळापूर, तेल्हारा व मूर्तिजापूर याठिकाणी छोट्या-मोठ्या औद्योगिक वसाहती आहेत. जिल्ह्यात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. त्यामुळे कापसावर आधारित उद्योगधंदे मोठ्या प्रमाणावर आहेत. तसेच यंत्रमाग, हातमाग, सूतगिरण्या या उद्योगांत ह्या जिल्ह्यात अनेकांना रोजगार मिळत आहे. जिल्ह्यात जिनिंग-प्रेसिंग मिल्स अनेक ठिकाणी आहेत. आकोट येथील सतरंज्या विशेष प्रसिध्द आहेत. अकोला येथे खादीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. पातुर तालुक्यात चंदनाचे व सागाचे लाकूड मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे.
कृषी उत्पन्नावर आधारित काही उद्योगही जिल्ह्यात आहेत. जिल्ह्यात अकोला व अकोट तालुक्यांत प्रत्येकी एक साखर कारखाना असून बार्शी-टाकळी तालुक्यात वनस्पती तूप, डाळ मिल व तेल गिरण्याही आहेत. जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील पारसचे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र प्रसिद्ध असून त्याची क्षमता ६२.५ मेगावॅट आहे.
दळणवळण
मुंबई-कोलकाता हा लोहमार्ग या जिल्ह्यातून जातो. मूर्तिजापूर हे या मार्गावरील प्रमुख जंक्शन आहे. जिल्ह्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उत्तर व दक्षिण भारत जोडणारी खांडवा-अकोला-पूर्णा ही रेल्वे वाहतूक १९६१ पासून सुरू आहे. अकोला जिल्ह्यात रस्त्यांचे जाळे सर्वत्र पसरले असून हाजीरा- धुळे - कोलकाता हा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ जिल्ह्यातून जातो.
अकोल्याचे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांपासूनचे अंदाजे अंतर
....पासून | अंतर (कि.मी.) |
मुंबई | ६०७ |
नागपूर | २५० |
औरंगाबाद | २५० |
रत्नागिरी | ७९९ |
पुणे | ४७६ |
संद़र्भ- महाराष्ट्र मागदर्शक नकाशा
समर्थ उद्योग, औरंगाबाद
समर्थ उद्योग, औरंगाबाद
जिल्ह्याला पर्यटनाच्या दृष्टिकोनातून देखील आगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. जिल्ह्यातील काही प्रेक्षणीय स्थळांची माहिती पुढीलप्रमाणे.
जिल्ह्यात नरनाळा हे अभयारण्य आहे. २ मे, १९९७ रोजी नरनाळा किल्ला व त्याच्या आजूबाजूचे घनदाट जंगल ‘नरनाळा वन्यजीव अभयारण्य’ म्हणून घोषित करण्यात आले. अकोल्यापासून ६० कि.मी. अंतरावर, सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये नरनाळा अभयारण्य वसले आहे. हे अभयारण्य अकोट तालुक्यात असून, १२.३५ चौ.कि.मी. क्षेत्रावर पसरले आहे. येथील तापमान ३५ ते ४३ अंश सेल्सिअस असते. वर्षभरात येथे ५०० ते ९०० मि.मी. पाऊस पडतो. या अभयारण्यात सांबर, बिबट्या, तसेच बार्किंग डिअर (विशिष्ट जातीचे हरीण) हे प्राणी प्रामुख्याने आढळतात. ह्या अभयारण्यस ऐतिहासिक, जैविक, पौराणिक व पुरातत्त्वशास्त्रीय दृष्टिकोनातून महत्त्वाचे स्थान असून हे पर्यटकांसाठी एक आकर्षणकेंद्र बनले आहे.
अभयारण्यास जाण्याचा मार्ग -
अकोटपासून नागपूर विमानतळ २७० कि.मी. अंतरावर आहे. नरनाळ्यापासून अकोला रेल्वे स्टेशन ६५ कि.मी. अंतरावर आहे, तर अकोट मीटर गेज रेल्वे स्टेशन २० कि.मी. अंतरावर आहे. नरनाळ्यास जायला अकोट व अकोल्यापासून बस व टॅक्सीदेखील उपलब्ध आहेत. ऑक्टोबर ते मे हे दिवस अभयारण्यास भेट दे़ण्यास उत्तम आहेत. शहानूर गाव हे या अभयारण्यासाठीचा राजमार्ग ठरतो, तर नरनाळा अभयारण्य हे मेळघाट व्याघ‘ प्रकल्पाचा दक्षिणेकडील राजमार्ग ठरतो. नरनाळा अभयारण्य ‘इको-टुरिझम’ साठी प्रसिद्ध आहे.
नरनाळा किल्ला - हा किल्ला पांडवकालीन असल्याचे मानले जाते. नरनाळा बहामनींकडे असताना (१४२५ च्या दरम्यान) या किल्ल्याची डागडुजी केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो. त्यानंतर हा किल्ला बहामनींकडून मराठ्यांच्या ताब्यात आला. त्यानंतर पेशव्यांकडून निजामाकडे आला व पुढे स्वातंत्र्यापर्यंत हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात होता.
या किल्ल्यावरूनच परिसरातील अभयारण्यास नरनाळा हे नाव मिळाले आहे. हा किल्ला तीन किल्ल्यांचा मिळून बनलेला आहे. पूर्वेस जाफराबाद किल्ला, मध्यभागी नरनाळा व पश्चिमेस तेलियागढ हे ते तीन किल्ले होत.
हा किल्ला सुमारे २५ चौ. कि. मी. क्षेत्रात पसरलेला आहे. यास सुमारे २७ दरवाजे (६ मोठे, २१ लहान) व असंख्य बुरूज आहेत. या किल्ल्यावर पाणी पुरवठा अतिशय उत्तम असल्याचे पुरावे आजही आढळतात. या किल्ल्यावर सुमारे ५० तळी आहेत. यांपैकी शक्कर तलाव प्रसिद्ध आहे. असा हा वैशिष्ट्यपूर्ण नरनाळा किल्ला पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो. अकोला तालुक्यातील महान येथे महाराष्ट्रातील पहिला कृषीपर्यटन (अग्रो टुरिझम) प्रकल्प उभारण्यात आला आहे. महान येथे काटेपूर्णा धरणाच्या सभोवती हा प्रकल्प साकारण्यात आला आहे.
अकोला तालुक्यात शंकराचे राजराजेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे. बाळापूर येथील मिर्झाराजे जयसिंगाची पाच घुमटांची छत्री व किल्ला प्रेक्षणीय आहे. पातूर हे जिल्ह्याच्या दक्षिण टोकाकडील स्थान असून येथे बौद्ध लेणी आहेत.
सामाजिक /विविध
शिक्षण - ग्रामीण भागात अधिक लोकसंख्या असलेल्या या जिल्ह्यात साक्षरतेचे ८१.४१ टक्के असे प्रमाण आहे. राज्याच्या साक्षरतेच्या प्रमाणापेक्षा हे प्रमाण बरेच जास्त आहे. १,१३६ प्राथमिक शाळा, १६ आश्रमशाळा, ३४१ माध्यमिक शाळा, १७ महाविद्यालये व १ कृषी विद्यापीठ (डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ ) यांनी सुसज्ज अशी अकोला जिल्ह्याची शिक्षणव्यवस्था आहे.
बैलगाडी शर्यतीत धावणार्या, विशिष्ट जातीच्या, सशक्त बैलांसाठी अकोला जिल्हा प्रसिद्ध आहे. या बैलांना ‘शंकरपट’ असे म्हटले जाते.
महाराष्ट्रातील एकमेव मुष्टियुद्ध (बॉक्सिंग) अकादमी अकोला येथे कार्यरत आहे.
विशेष व्यक्ती
वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेचे, आरोग्याचे महत्त्व स्वत: हातात खराटा घेऊन, समाजाला समजावून सांगणार्या संत गाडगेबाबांचा मूर्तिजापूर येथे आश्रम आहे.
अकोला जिल्ह्यात जन्म झालेले संगणक तज्ज्ञ पद्मश्री विजय भाटकर हे मूळचे मूर्तिजापूर तालुक्यातील आहेत. तर लोककवी म्हणून महाराष्ट्रात प्रसिध्द असलेले डॉ. विठ्ठल वाघ हे मूळचे अकोल्याचे आहेत.
No comments:
Post a Comment