Monday, September 3, 2012

राज्यव्यवस्थेच्या अभ्यासक्रमावरील नमुना प्रश्नपत्रिका - २

राज्यव्यवस्थेच्या अभ्यासक्रमावरील नमुना प्रश्नपत्रिका - २

महेश शिरापूरकर ,गुरुवार, १० मे २०१२
प्राध्यापक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.

shirapurkarm@gmail.com 
सामान्य अध्ययन पेपर क्र. २ मधील प्रकरण ८ ते १५ या उर्वरित प्रकरणांवर आधारित नमुना प्रश्नांचे स्वरूप आजच्या लेखामध्ये पाहता येईल. प्र.  राज्यघटनेतील कोणत्या कलमामध्ये वृत्तपत्र स्वातंत्र्याचे तत्त्व निहित आहे?
(१) कलम १९(२)कलम १९ (१)    (३)कलम १९ (१) (अ)(४)कलम १९ (२)
प्र.  ११ व्या कार्यकाळातील प्रेस परिषदेचे अध्यक्ष कोण?
(१) न्या. मुधोळकर (२)न्या. सरकारिया(३)न्या. जी. एन. रे(४)न्या. मरकडेय काटजू    
प्र. कितव्या सार्वत्रिक निवडणुकांच्या आधी निवडणूक आयोग त्रिसदस्यीय होता?
(१)तिसऱ्या    (२)पाचव्या    (३)सातव्या    (४)नवव्या.
प्र. भारतामध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिन्सचा पहिल्यांदा वापर कोणत्या राज्यात करण्यात आला?
(१) पंजाब    (२)महाराष्ट्र (३) उत्तर प्रदेश  (४) केरळ
प्र. ‘प्रशासकीय कायदा’ या संकल्पनेचा उदय कोठे झाला?
(१) इंग्लंड    (२)ग्रीस(३)फ्रान्स(४)    स्वीडन
प्र. केंद्रीय प्रशासकीय न्यायासन (कॅट) बाबत कोणती बाब सत्य नाही?
(१)कलम ३२३ (अ) मध्ये कॅटची तरतूद आहे. (२)कॅटमध्ये सध्या १५ नियमित खंडपीठे आहेत. (३)तिच्या अधिकारक्षेत्रामध्ये अखिल भारतीय सेवा येतात. (४)    तिच्या अधिकारक्षेत्रामध्ये संसदेच्या सचिवालयातील कर्मचारी वर्गाचा समावेश होतो.(५)कॅट हे एक सदस्यीय मंडळ नसते.(अ) १, २ आणि ४ (ब)    २ आणि ३(क)१, ३ आणि ५ (ड) २ आणि ४
प्र.  भारतीय पुरावा अधिनियमातील कोणत्या कलमानुसार माहिती उघड करण्याची सक्ती संबंधित अधिकाऱ्यावर करता येत नाही?
(१) कलम १२३ (२)    कलम १२४    (३) कलम १२५ (४)    कलम १२६ 
प्र. पुढीलपैकी कोणता अधिनियम भारताबाहेरील भारतीय नागरिकांना लागू आहे?
(१) भारतीय पुरावा अधिनियम(२) कार्यालयीन गुप्तता अधिनियम (३)माहिती अधिकार (४)पर्यावरण संरक्षण अधिनियम
प्र. माहिती अधिकार अधिनियमातील कोणत्या कलमामध्ये सार्वजनिक हितासाठी माहिती उघड करण्याची अधिकाऱ्यांना अनुमती आहे?
(१) कलम ८(२)कलम ८ (१)(३)कलम ८ (२)(४)कलम २२
प्र. पर्यावरण संरक्षण अधिनियमातील शासकीय विश्लेषकाबाबत पुढीलपैकी कोणते विधान असत्य आहे?
(१) कलम १३ मध्ये या पदाची तरतूद आहे. (२)    या पदाची नियुक्ती संसदेद्वारे केली जाते. (३)तो पर्यावरणीय प्रयोगशाळेचा प्रमुख असतो.(४)    या अधिनियमातील कलम १० मध्ये या पदाची पात्रता आहे. (अ) १, ३ आणि ४  (ब) २ आणि ४  (क) २, ३ आणि ४  (ड) १ आणि ३
प्र. जिल्हा ग्राहक मंचाकडे किती रकमेपर्यंतच्या तक्रारी, दावे दाखल करता येऊ शकतात?
(१) १ लाख रु.(२)५ लाख रु.(३)    २० लाख रु.    (४)५० लाख रु.
प्र. असामान्य परिस्थितीमध्ये किती तासांच्या आत माहिती पुरविणे बंधनकारक आहे?
(१) १२ तास(२)२४ तास(३)३६ तास(४)४८ तास 
प्र. माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत संगणकाशी संबंधित अपराध कोणत्या कलमाशी संबंधित आहे?
(१) कलम ६५(२)कलम ६६(३)कलम ६६ (अ)(४)कलम ६६ (ब)
प्र.  पुढीलपैकी कोणते कलम लोकसेवकाच्या भ्रष्टाचाराशी संबंधित नाही?
(१) कलम ७(२)कलम ९(३)कलम ११(४)कलम १३
प्र. अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमांतर्गत घडलेल्या अपराधाचे अन्वेषण कोणत्या दर्जाचा अधिकारी करू शकतो?
(१) पोलीस उपनिरीक्षक(२)पोलीस निरीक्षक(३)पोलीस उपअधीक्षक    (४)पोलीस अधीक्षक
प्र. अनुसूचित जाती-जमातीच्या लोकांसाठी राज्य शासन कोणाच्या अधिपत्याखाली संरक्षक उपशाखेची रचना करते?
(१) पोलीस अधीक्षक(२)पोलीस आयुक्त(३)पोलीस महानिरीक्षक (४)पोलीस उपमहानिरीक्षक
प्र. नागरी हक्क संरक्षण अधिनियमातील कलम ४ हे कशाशी संबंधित आहे?
(१)धार्मिक अपात्रता(२)सामाजिक अयोग्यता(३)    सार्वजनिक ठिकाणी प्रवेश नसणे.(४)    माल विक्री वा सेवा पुरविण्यास नकार.
प्र.  भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमातील कोणत्या कलमानुसार लाच देणे हा गुन्हा आहे?
(१) कलम ११(२)कलम १२(३)कलम १३(४)    कलम १४
प्र.  कौटुंबिक हिंसाचार (प्रतिबंधक) अधिनियम पुढीलपैकी कोणत्या राज्याला लागू नाही?
(१) मिझोराम (२)जम्मू व काश्मीर (३)ओडिशा    (४) केरळ
प्र. कौटुंबिक हिंसाचाराबाबतची माहिती नागरिक सर्वप्रथम कोणाला देऊ शकतात?
(१) पोलीस (२)न्यायालय (३)सुरक्षा अधिकारी (४) सेवा पुरवठादार
प्र. अखिल भारतीय सेवांच्या संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या.
(१)राज्यघटनेतील कलम ३१२ मध्ये त्यांच्या निर्मितीची प्रक्रिया नमूद आहे.
(२)१९५० मध्ये अखिल भारतीय सेवा अधिनियम करण्यात आला.
(३)भारतीय वन सेवेचे व्यवस्थापन वन आणि पर्यावरण मंत्रालयामार्फत केले जाते. (४)    राज्यसभा नवीन अखिल भारतीय सेवा निर्माण करू शकते.
उपरोक्त विधानांपैकी चुकीचे विधान कोणते?
(अ) २ आणि ४ (ब)    १ आणि ४    (क)१, ३ आणि ४(ड)    २ आणि ३
प्र.  पुढील पैकी कोणत्या समितीवर राज्यसभेचा एकही सदस्य नसतो?
(१) अंदाज समिती (२)    लोक लेखा समिती (३)    सार्वजनिक उपक्रम समिती        (४)संयुक्त समिती
प्र. भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (उअॠ) हे कोणत्या समितीचे मित्र मानले जातात? 
(१) अंदाज समिती (२)    लोक लेखा समिती(३)सार्वजनिक उपक्रम समिती  (४)संयुक्त समिती.
उपरोक्त नमुना प्रश्न हे प्रसारमाध्यमे, निवडणूक प्रक्रिया, प्रशासकीय कायदा, केंद्र आणि राज्य शासनाचे विशेषाधिकार, काही समर्पक कायदे, सामाजिक कल्याण आणि सामाजिक कायदा, लोकसेवा आणि सार्वजनिक खर्चावरील नियंत्रण इत्यादी प्रकरणांवरील आहेत. प्रसारमाध्यमे आणि राज्यघटना यांच्या संबंधांचा विचार आपण करत नाही. तथापि घटनेच्या कलमामधून अनुस्यूत असणारा संबंध विचारात घ्यावा. तसेच विविध संस्था/समिती/आयोग यांच्या अध्यक्षांची नावे लक्षात असावीत. सार्वत्रिक निवडणुकीच्या अभ्यासात प्रत्येक निवडणुकीची महत्त्वाची वैशिष्टय़ेही पाहावीत. अधिनियमांवरील प्रश्न हे एखाद्या तरतुदीतील महत्त्वपूर्ण भाग विचारून त्याच्याशी संबंधित कलम किंवा संबंधित अधिनियमातील संस्था, आयोग, यंत्रणा आणि  अधिकारी याबाबतही प्रश्न विचारले जाऊ शकतात. लोकसेवा प्रकरणातील विभिन्न सेवांबाबतही विशेषत्वाने प्रश्न विचारले जाऊ शकतात. सार्वजनिक खर्चावरील नियंत्रणाबाबत वित्तीय समित्या यांच्यातील परस्पर संबंध, तरतुदींची तुलना आणि कॅगसारख्या यंत्रणांशी संबंध विचारात घेतले जावेत. थोडक्यात प्रत्येक प्रकरणावरील माहितीप्रधान, विश्लेषणात्मक, जोडय़ा लावा, सुसंगत वा सत्य नसणारे विधान ओळखा वगैरे प्रश्नांचा भरपूर सराव करणे अपेक्षित आहे.

No comments: