Monday, September 3, 2012

‘एमपीएससी’चा राजमार्ग-मुख्य परीक्षा : इतिहासावरील नमुना प्रश्नांची तयारी

‘एमपीएससी’चा राजमार्ग-मुख्य परीक्षा : इतिहासावरील नमुना प्रश्नांची तयारी


शरद पाटील, सोमवार, १६ एप्रिल २०१२
प्राध्यापक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.
sharadpatil11@gmail.com
घटना, व्यक्ती, स्थल, काळ हे इतिहासाचे आधार मानले जातात, पण इतिहास म्हणजे  केवळ घडलेल्या घटनांचे वर्णन नव्हे, तर त्या घटनांची पाश्र्वभूमी, संबंधित प्रक्रिया व त्या घटनांचे तत्कालीन व दीर्घकालीन परिणाम या बाबीही लक्षात घ्याव्या लागतात.
राज्यसेवा मुख्य परीक्षेतील इतिहास या घटकाची तयारी करताना विद्यार्थ्यांनी ही बाब कायम स्मरणात ठेवावी. आजच्या लेखात आपण या घटकावर विचारले जाणारे प्रश्न नेमके कसे असू शकतील याची चर्चा करणार आहोत. या लेखात चर्चिलेले प्रश्न मार्गदर्शक म्हणून लक्षात घ्यावेत. आयोगाच्या प्रश्नपत्रिकेत असेच प्रश्न विचारले जातील असे नाही. विद्यार्थ्यांच्या विचारांना व तयारीला एक दिशा मिळावी हाच या नमुना प्रश्नांच्या चच्रेमागील उद्देश आहे.
(१) ब्रिटिशांचे भारतात आगमन झाले त्या वेळी भारतात कोणता मुघल शासक राज्य करत होता?
(अ) अकबर (ब)    हुमायून (क) जहाँगीर (ड) शहाजहान
(२) कोणत्या कायद्यानुसार ईस्ट इंडिया कंपनीची भारतावरील व्यापारी मक्तेदारी समाप्त झाली?
(अ) पीट्स एॅक्ट        (ब) चार्टर एॅक्ट १८१३
(क) चार्टर एॅक्ट १८३३    (ड) चार्टर एॅक्ट १८५३
(३) कायमधारा पद्धतीविषयी नमूद केलेल्या खालील विधानांपकी अयोग्य विधान ओळखा.
(अ)    कायमधारा महसूल पद्धतीलाच जमीनदारी महसूल पद्धती या
नावानेही ओळखली जात असे.
(ब)    लॉर्ड कॉर्नवॉलिस व ब्रिटिश अधिकारी जॉन शोर या पद्धतीचे जनक             होते.  
(क)    १७९३ मध्ये बंगाल, बिहार, ओरिसा या प्रांतात ही पद्धत सुरू झाली.  
(ड)    भारतात सर्वात जास्त क्षेत्रावर या पद्धतीचा अवलंब केला जात होता.
(४) जातिभेद निर्मूलनासाठी शैव विवाह पद्धतीचा पुरस्कार कोणत्या समाजसुधारकाने केला होता?
(अ) महात्मा जोतिबा फुले     (ब) राजा राममोहन रॉय
(क) स्वामी दयानंद सरस्वती    (ड) स्वामी विवेकानंद
(५) योग्य जोडय़ा जुळवा.
(अ) राष्ट्रीय सभेतील फूट         (१)    १९३६
(ब) राष्ट्रीय सभा-मुस्लिम लीग ऐक्य         (२)    १९०७  
(क) पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव           (३)    १९२९  
(ड) शेतकऱ्यांविषयक महत्त्वाचे ठराव         (४)    १९१६
क्र.    (अ)    (ब)    (क)    (ड)
(१)    १    २    ३    ४
(२)    ४    ३    २    १
(३)    २    १    ४    ३
(४)    २    ४    ३    १
(६) योग्य कालक्रमानुसार मांडणी करा.
(१) दिल्ली येथे राजधानी स्थानांतर (२) मोर्ले िमटो सुधारणा कायदा.  
(३) होमरूल चळवळीची सुरुवात    (४) पहिल्या महायुद्धाची सुरुवात.
(अ) १, २ , ३, ४     (ब) २, १, ४, ३
(क) ३, ४, २, १     (ड) ४, ३, १, २
(७) खाली दिलेल्या विधानांच्या संदर्भात योग्य पर्यायाची निवड करा.
(१) महात्मा गांधीजींनी असहकार चळवळ १९२२ मध्ये मागे घेतली.  
(२) चौरीचौरा या ठिकाणी झालेल्या िहसाचारामुळे गांधीजींनी ती चळवळ थांबवली.  
(अ) विधान १ व २ दोन्ही बरोबर आहेत व २ हे १चे योग्य स्पष्टीकरण आहे.
(ब) विधान १ व २ दोन्ही बरोबर आहेत व २ हे १चे योग्य स्पष्टीकरण नाही.
(क) १ बरोबर २ चूक  
(ड) १ चूक २ बरोबर
(८) योग्य विधान ओळखा.
(१) चीनने भारतावर ऑक्टोबर १९६२ मध्ये आक्रमण केले त्या वेळी भारतात प्रथमत: राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा करण्यात आली.  
(२) राष्ट्रीय सभेने १९५५च्या आवडी अधिवेशनात समाजवादी कार्यक्रमाचा स्वीकार केला.
(३) वाघ संरक्षणविषयक ‘वाघ परियोजने’ची सुरुवात १९८३ मध्ये करण्यात आली.  
(४) अमृतसर सुवर्णमंदिराचा ताबा घेतलेल्या मूलतत्त्ववादी गटाचा पाडाव करण्यासाठी जून १९८४ मध्ये ऑपरेशन ‘ब्लू स्टार’ हाती घेण्यात आले.
(अ) १, २, ३, ४ (ब) १, २, ३    (क) २, ३, ४ (ड) १, २, ४
(९) १९३२ मध्ये प्रदíशत झालेला मराठीतील पहिला बोलपट कोणता?
(अ) राजा हरिश्चंद्र (ब) सरंध्री (क) अयोध्येचा राजा (ड) संत तुकाराम
(१०) मराठी भाषेतील पहिली कादंबरी म्हणून उल्लेखलेल्या ‘यमुना पर्यटन’ कादंबरीचे लेखक कोण?
(अ) बाळशात्री जांभेकर     (ब) बाबा पद्मनजी
(क) ह. ना. आपटे        (ड) मोरो वाळवेकर
अशारीतीने प्रत्यक्ष प्रश्नपत्रिकेतील प्रश्न माहितीप्रधान, विश्लेषणात्मक, कार्यकारण संबंधात्मक, संकल्पनात्मक, कालक्रमावर आधारित स्वरूपाचे असू शकतात. माहितीप्रधान प्रकारात (प्रश्न १, २, ४, ९, १०) स्थळ, वर्ष, व्यक्ती, संस्था, ग्रंथ, वृत्तपत्रे यांबाबत प्रश्न विचारले जातात. हे प्रश्न पूर्णत: वस्तुनिष्ठ व थेट स्वरूपाचे आहेत. या प्रश्नांची तयारी करताना ‘माहिती’ लक्षात ठेवण्यावर भर द्यावा. सातत्याने नोट्स, संदर्भसाहित्याचे वाचन; काही मुद्यांचे पाठांतर व वस्तुनिष्ठ प्रश्नांचा सराव यासाठी उपयुक्त ठरतो.
प्रश्नपत्रिकेत संकल्पनात्मक प्रश्नही ( प्रश्न ३) विचारले जातात. एखादी संकल्पना, घटक, तिचे विविध पलू, आयाम यांचा सूक्ष्म विचार विद्यार्थी करतात की नाही हे या प्रश्नांद्वारे तपासले जाते. विषयाचे विविध पलू लक्षात घेऊन केलेला सूक्ष्म अभ्यासच या प्रश्नांच्या तयारीसाठी उपयुक्त ठरेल.
कार्यकारण संबंधात्मक प्रश्नांमध्ये (प्रश्न ७) इतिहासात घडलेली एखादी घटना- तिची पाश्र्वभूमी, कारणे अथवा या घटनेचे पुढील काळावर झालेल्या परिणामांकडे विद्यार्थी कसा पाहतो हे या प्रश्नांमधून तपासले जाते. इतिहासातील एखादी घटना अभ्यासतेवेळी त्या घटनेचा सुटा विचार न करता त्या घटनेची पाश्र्वभूमी, कारणे आणि परिणाम अशी व्यापक विचार करण्याची सवय अशा स्वरूपाचे प्रश्न सोडविण्यासाठी उपयुक्त ठरेल.
कालक्रमावर आधारित विविध प्रकारचे प्रश्न विचारले जातात. उदा., घटना व कालक्रम (प्रश्न ५) यांच्या जोडय़ा लावा, काळानुरूप घटनांची मांडणी करणे (प्रश्न ६), अन्य प्रश्नांतर्गतदेखील कालक्रमाचा संदर्भ (प्रश्न ८) येऊ शकतो. महत्त्वाच्या घटनांच्या तारखा, वष्रे लक्षात ठेवणे; एका क्षेत्रात घटना घडत असताना त्याच काळात अन्य क्षेत्रात, अन्य प्रदेशात घडणाऱ्या घटनांकडे काळजीपूर्वक लक्ष देणे ही अशा प्रश्नांच्या तयारीसाठी योग्य रणनीती ठरू शकते.
विद्यार्थी मित्र-मत्रिणींनो, आजपर्यंतच्या लेखात इतिहास या घटकाची तयारी कशी करायची याचा सविस्तर विचार केला आहे. थोडक्यात सांगायचे झाल्यास अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण, योग्य संदर्भग्रंथांची निवड आणि परीक्षाभिमुख सखोल, सातत्यपूर्ण तयारी हाच यशाचा ‘राजमार्ग’ आहे. इतिहासाच्या तयारीसाठी आपणास शुभेच्छा!

No comments: