Monday, September 3, 2012

‘एमपीएससी’चा राजमार्ग:मुख्य परीक्षा:‘सामान्य अध्ययन पेपर ४’:विज्ञान आणि तंत्रज्ञान विकास-नमुना प्रश्न

‘एमपीएससी’चा राजमार्ग:मुख्य परीक्षा:‘सामान्य अध्ययन पेपर ४’:विज्ञान आणि तंत्रज्ञान विकास-नमुना प्रश्न




कैलास भालेकर, मंगळवार, ५ जून २०१२
प्राध्यापक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.
kailasbhalekar@gmail.com 
सामान्य अध्ययन - ४ मधील विज्ञान आणि तंत्रज्ञान विकास या घटकावर  आधारित सरावासाठी नमुना प्रश्न या लेखात देण्यात आलेले आहेत. बरोबर असणारे पर्याय ठळक अक्षरांमध्ये देण्यात आले आहेत. परीक्षेच्या सर्वागीण तयारीसाठी संपूर्ण अभ्यासक्रम अभ्यासणे आवश्यक असून परीक्षाभिमुख तयारीसाठी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.


प्र. १ सोलर फोटोव्होल्टाईक सेल (सौर घट) यासंदर्भातील खालीलपकी कोणती विधाने बरोबर आहेत?
विधान (अ) : सोलर फोटोव्होल्टाईक सेलमध्ये सौरऊर्जेचे रूपांतर विद्युतऊर्जेमध्ये करतात.
विधान (ब) : सोलर फोटोव्होल्टाईक सेलमध्ये अर्धवाहकाचा (सेमिकंडक्टर) वापर करतात.
विधान (क) : सोलर फोटोव्होल्टाईक घट हा पारंपरिक ऊर्जास्रोत आहे.
(१) विधान (अ) बरोबर (२) विधान (अ), (ब) बरोबर  
(३) विधान (अ), (क) बरोबर (४) विधान (ब), (क) बरोबर
प्र. २ भारतीय अणुऊर्जा कार्यक्रमासंदर्भातील टप्प्यांचा अचूक क्रम कोणता?
(अ) प्रेशराईज्ड हेवी वॉटर रिअ‍ॅक्टर (PHWR)
(ब) थोरिअमवर आधारित अणूभट्टय़ा
(क) फास्ट ब्रीडर रिअ‍ॅक्टर
(१) अ, क, ब (२) ब, क, अ (३) अ, ब, क (४) ब, अ, क
प्र. ३    महासंगणकाची (सुपर कॉम्प्युटर) कार्यक्षमता मोजण्यासाठी वापरण्यात येणारे फ्लॉप्स (ो’स्र्२) म्हणजे ..
(१) फर्स्ट ऑपरेशन्स पर सेकंद (२) फ्रिक्वेन्सी ऑफ ऑपरेशन्स पर सेकंद  
(३) फ्लोटिंग पॉइंट ऑपरेशन्स पर सेकंद (४) यांपकी नाही.
प्र. ४ ‘आधार’ कार्डासंदर्भातील खालीलपकी कोणती विधाने बरोबर आहेत?
विधान (अ) : बायोमेट्रिक माहितीद्वारे नागरिकांक देण्यात येतो.
विधान (ब) : ‘आधार’कार्डाद्वारे दिला जाणारा नागरिकांक ‘१२ अंकी’ आहे.
(१) विधान (अ) बरोबर (२) विधान (ब) बरोबर  
(३) दोन्हीही विधाने बरोबर (४) दोन्हीही विधाने चूक
प्र. ५ राष्ट्रीय ई-प्रशासन योजनेसंदर्भातील खालीलपकी कोणती विधाने बरोबर आहेत?
विधान (अ) : राष्ट्रीय ई-प्रशासन योजनेंतर्गत २७ अभियान प्रकल्पांचा (मिशन मोड प्रोजेक्टचा) समावेश करण्यात आला आहे.
विधान (ब) : राष्ट्रीय ई-प्रशासन योजनेंतर्गत सार्वजनिक सुविधा केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे.
विधान (क) : राष्ट्रीय ई-प्रशासन योजनेची अंमलबजावणी फक्त केंद्र शासन स्तरावर केली जाणार आहे.
(१) विधान (अ), (ब) बरोबर (२) विधान (अ), (क) बरोबर  
(३) विधान (ब), (क) बरोबर (४) विधान (अ), (ब), (क) बरोबर
प्र. ६    क्रायोजेनिक इंजिनमध्ये ..
(१) सामान्य तापमानाला हायड्रोजनचा इंधन म्हणून तर शीत तापमानाला ऑक्सिजनचा ऑक्सिडीकारक म्हणून वापर करतात.  
(२) शीत तापमानाला हायड्रोजनचा इंधन म्हणून तर शीत तापमानाला ऑक्सिजनचा ऑक्सिडीकारक म्हणून वापर करतात.
(३) शीत तापमानाला हायड्रोजनचा इंधन म्हणून तर सामान्य तापमानाला ऑक्सिजनचा ऑक्सिडीकारक म्हणून वापर करतात.  
(४) यांपकी नाही.
प्र. ७ खालीलपकी चुकीची जोडी ओळखा.
(१) रिसोर्स सॅट : संसाधनविषयक माहितीसाठीचा उपग्रह  
(२) ओशन सॅट : सागरी संशोधनासाठीचा उपग्रह
(३) हॅम सॅट : हवामानविषयक माहितीसाठीचा उपग्रह
(४) कार्टे सॅट : अद्ययावत नकाशाविषयक माहितीसाठीचा उपग्रह
प्र. ८ ‘बीटी’ कापूसमध्ये ‘बीटी’ हा घटक म्हणजे ..
(१) बेसिक थुरिन जेनिसीस (२) बॅसिलस थुरिन जेनिसीस
(३) बायोकॅटॅलिस्ट थुरिन जेनिसीस (४) यांपकी नाही
प्र. ९ होलोग्राफी तंत्राच्या संदर्भातील खालीलपकी कोणती विधाने बरोबर आहेत?
विधान (अ) : होलोग्राफीद्वारे त्रिमिती चित्रनिर्मिती करता येते.
विधान (ब) : ‘लेसर’ किरणांचा वापर होलोग्राफीसाठी केला जाऊ शकतो.
(१) विधान (अ) बरोबर (२) विधान (ब) बरोबर  
(३) दोन्हीही विधाने बरोबर (४) दोन्हीही विधाने चूक
प्र.  १० राष्ट्रीय दूरसंवेदी केंद्र (नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर) खालीलपकी कोणत्या ठिकाणी आहे?
(१) चेन्नई (२) तिरुअनंतपूरम (३) हैदराबाद (४) बंगलोर
प्र. ११    राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेसंदर्भातील (NDMA) खालीलपकी कोणती विधाने बरोबर आहेत?
विधान (अ) : आपत्ती व्यवस्थापनासाठीची धोरणे, योजना आणि मार्गदर्शक तत्त्वे ठरविणारी ही भारतातील सर्वोच्च यंत्रणा आहे.
विधान (ब) : राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचे चेअरमन भारताचे गृहमंत्री असतात.
(१) विधान (अ) बरोबर (२) विधान (ब) बरोबर  
(३) दोन्हीही विधाने बरोबर (४) दोन्हीही विधाने चूक
संपूर्ण अभ्यासक्रमाचे विश्लेषण करून परीक्षाभिमुख तयारी करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान विकास या घटकामधील संकल्पनांचे आकलन आणि उपयोजन यावर भर देण्याची गरज आहे. तसेच, विज्ञान आणि तंत्रज्ञान विकास यामधील प्रचलित घडामोडी, शासकीय कार्यक्रम, योजना आणि धोरणे यांची माहितीदेखील महत्त्वाची ठरेल.

No comments: