Monday, September 3, 2012

‘एमपीएससी’चा राजमार्ग - मुख्य परीक्षा :अनिवार्य इंग्रजी :आकलनक्षमतेची कसोटी

‘एमपीएससी’चा राजमार्ग - मुख्य परीक्षा :अनिवार्य इंग्रजी :आकलनक्षमतेची कसोटी

अपर्णा दीक्षित, सुश्रुत रवीश ,शुक्रवार, ६ एप्रिल २०१२
प्राध्यापक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.

dixitaparna1@gmail.com
sushruth.ravish@gmail.com
इंग्रजी अनिवार्य पेपरमधील अजून एक महत्त्वाचा घटक म्हणजे इंग्रजी आकलनावर आधारित प्रश्न. यामध्ये उताऱ्यावरील प्रश्न, एकतृतीयांश सारांश, उताऱ्याची मुद्देसूद रचना करणे या प्रश्नप्रकारांचा समावेश होतो. या तिन्ही प्रश्नप्रकारांमधील समान धागा म्हणजे दिलेला उतारा वाचून, समजून घेऊन त्यातून झालेल्या आकलनातून विद्यार्थ्यांने उत्तर देणे अपेक्षित आहे. आकलनावर आधारित प्रश्न हा सर्व स्पर्धा परीक्षांचा एक अविभाज्य घटक आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, अशा परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ज्या प्रकारची पदे उमेदवार भूषवतात, त्यामध्ये पदोपदी वेगवेगळे निर्णय घेणे अपेक्षित असते आणि असे निर्णय घेताना उपलब्ध माहितीचा योग्य उपयोग करून घ्यावा लागतो. ही माहिती अनेकदा लिखित स्वरूपात (अहवाल, अधिनियम, प्रशासकीय नियम, विविध योजना पत्र) असते. तेव्हा अशी माहिती वापरता येण्यासाठीची आकलनक्षमता असणे, योग्य तो मजकूर वापरता येणे, ही अशी पदे भूषवताना अतिशय गरजेची कौशल्ये आहेत.
एकतृतीयांश सारांश (Precis-Writing) : यामध्ये ३०० शब्दांमध्ये उतारा दिलेला असतो. यामध्ये उमेदवाराने स्वत:च्या शब्दामध्ये दिलेल्या उताऱ्याचा एकतृतीयांश सारांश, म्हणजे साधारण १०० शब्द लिहिणे अपेक्षित आहे. यामध्ये दिले जाणारे उतारे हे विविध क्षेत्रांमधून घेतलेले असतात. अनेकदा या उताऱ्यामधून उमेदवाराच्या सामाजिक जाणिवा किती धारदार/बोथट आहेत हेदेखील पाहिले जाते. तसेच, दिलेल्या उताऱ्यामधला वेचक भाग कोणता हे विद्यार्थ्यांला ओळखता येते का? हेसुद्धा यामधून पाहिले जाते.
एकतृतीयांश सारांश लिहिताना सगळय़ात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सारांश स्वत:च्या शब्दांत लिहावा तसेच लिखाणामधून स्वत:ची शैली अधोरेखित करता येणे आवश्यक आहे. दिलेल्या उताऱ्र्यामधील वाक्ये तशीच्या तशी लिहू नयेत. साधारण ३-४ वाक्य मिळून लेखक कोणता मुद्दा सांगण्याचा प्रयत्न करत आहे याचा बारकाईने विचार करावा. 
उदा. ,It is important to understand that the secondary status of women in traditional society derives from an overtly a few of women as possessions rather than as partners in the family and kinship networks. Thus parents refer to daughters as 'alien wealth' in a literal sense, and not as mere metaphor. While men are being inculcated with greater individualism as a result of social change, women are not supposed to have independent concerns and aspirations beyond providing for the needs of their families.
हा मूळ प्रश्नातील पहिला परिच्छेद आहे. यामध्ये ३ वाक्ये आणि साधारण ८५ शब्द आहेत. मूळ प्रश्नात अजून तीन परिच्छेद आहेत. इथे आपण उदाहरणादाखल फक्त पहिला परिच्छेद विचारात घेतला आहे.
सारांश : The inequality in treatment of women vis-a-vis men stems from the fact that, women are looked upon more as material possessors, without any personal aspirations.
उताऱ्यावरील प्रश्न : साधारण ३०० शब्दांच्या उताऱ्यावर ५-६ प्रश्न विचारले जाऊ शकतात. यामध्ये बहुतेक प्रश्नांची उत्तरे उताऱ्याच्या सखोल वाचनातून मिळू शकतात. मात्र १-२ प्रश्नांची उत्तरेही विद्यार्थ्यांला उताऱ्याचा गíभतार्थ समजून लिहायची असतात. अशा प्रश्नांमधूनच विद्यार्थ्यांच्या आकलनक्षमतेचा कस तपासला जातो.
उदा., Q.What is your opinion on given topic  किंवा Q. What action you would have taken being in place of author? and why?  उताऱ्यावर आधारित प्रश्न सोडवताना साधारणपणे विद्यार्थ्यांना खालील अडचणी येतात.
(अ)उताऱ्यातील अनेक/काही शब्दांचे अर्थ न समजणे- अशा वेळेस दिलेल्या संदर्भावरून शब्दांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करावा. शब्द जर कुठल्या प्रत्ययाचा वापर करून सुरू होत असतील तर त्यावरून शब्दाचा अर्थ कळणे सोपे होते. अशा प्रत्ययांचा अभ्यास करावा. जसे की,
mal___ वाईट; ben      चांगले. उदा., benevolent, malfunctioning 
इ.((AF)  सर्व शब्दांचे अर्थ माहीत असूनदेखील लेखकाचा नक्की काय म्हणायचे ते न कळणे- याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे इंग्रजीमधील म्हणी, वाक्प्रचार यांची पुरेशी ओळख नसणे. यामुळे सर्व शब्दांचे अर्थ माहीत असणे अशी आभासी प्रतिमा निर्माण होते, जिथे विद्यार्थ्यांला शब्दसमूहाचे (phrases, idioms) अर्थ माहीत असणे अपेक्षित असते. 
उदा., by skin of teeth संकटातून/अवघड परिस्थितीतून कसेबसे, शेवटच्या क्षणी वाचणे.You passed the course by the skin of your teeth, so you won't have to repeat it next semester.उदा., win hands down- सहजपणे जिंकणे, खूप श्रम न घेता जिंकणे. Roger Federer won a hands down victory against Andy Murray in straight sets.
उताऱ्याची मुद्देसूद रचना : हा प्रश्नप्रकार जवळजवळ एकतृतीयांश प्रश्नासारखाच आहे. यामध्ये सुद्धा ३०० शब्दांमध्ये दिलेला उतारा समजून घेऊन, विद्यार्थ्यांने तो आपल्या शब्दांमध्ये लिहिणे अपेक्षित आहे. मात्र इथे कोणतीही शब्दमर्यादा नाही. म्हणजेच सारांशरूपातील लेखन अपेक्षित नाही. विद्यार्थी स्वत: २५०-३०० शब्द लिहू शकतो. दिलेल्या संकल्पनेचे आकलन करून ती संकल्पना स्वत:च्या शब्दांत मांडता येणे हे यामधील कौशल्य आहे. 
इंग्रजी आकलनक्षमतेवर आधारित प्रश्नांवर गुणांसाठी अवलंबून असणे कोणत्याही उमेदवारासाठी अपरिहार्य आहे. एकूण ७ प्रश्नप्रकारांपकी ३ पूर्ण प्रश्नप्रकार हे आकलनाशी निगडित आहेत. या प्रश्नप्रकारांमध्ये प्रावीण्य मिळवण्याकरिता दर्जेदार इंग्रजी वृत्तपत्रांचे तसेच नियतकालिकांचे नियमित वाचन करणे हा एक मार्ग आहे. मात्र नुसते वाचन करून न थांबता, आपल्याला वाचलेले किती समजले (म्हणजेच आपली आकलनक्षमता) हे शिक्षकांच्या, मित्रांच्या मदतीने पडताळून पाहणे ही या घटकासाठीची आवश्यक पूर्वतयारी आहे. 

No comments: