सुजित शि. पवार - सोमवार, १२ मार्च २०१२
प्राध्यापक, द युनिक अॅकॅडमी, पुणे.
admin@theuniqueacademy.com
सध्याच्या काळातील कोणत्याही स्पर्धा परीक्षेतील एक अविभाज्य घटक म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी. शालेय स्तरावरील स्पर्धा परीक्षा असो वा वेगवेगळय़ा अभ्यासक्षेत्रांत घेतल्या जाणाऱ्या प्रवेशपरीक्षा किंवा विविध क्षेत्रांतील अधिकारीपदांसाठी होणाऱ्या निवड परीक्षा असो, अशा परीक्षांमध्ये बुद्धिमत्ता चाचणीविषयक प्रश्न विचारले जातात.
प्राध्यापक, द युनिक अॅकॅडमी, पुणे.
admin@theuniqueacademy.com

परीक्षेला बसलेला उमेदवार विचारलेल्या प्रश्नांची किती लवकरात लवकर उत्तरे देऊ शकतो याची चाचणी घेतली जाते. उमेदवाराच्या बुद्धीचे मापन केला जाणारा कोणताही प्रश्न या घटकात विचारला जातो. राज्यसेवा पूर्वपरीक्षेत एकूण २०० प्रश्न विचारले जातात. यातील ५० प्रश्न बुद्धिमत्ता चाचणी यावर असतात. इतर कोणत्याही घटकापेक्षा या घटकावरील प्रश्नांची संख्या सर्वात जास्त असल्यामुळे या चाळणी परीक्षेत पास होण्यासाठी हा घटक निर्णायक ठरतो. प्रश्नांचा विचार केल्यास इतर कोणत्याही घटकापेक्षा बुद्धिमत्ता चाचणी या घटकावरील प्रश्न सोडविण्यासाठी तुलनेने जास्त वेळ लागतो. तो वेळ वाचविण्यासाठी विविध क्लृप्त्या, सूत्रे वापरणे व प्रश्न सोडविण्याचा सराव करणे गरजेचे असते. बुद्धिमत्ता चाचणी या घटकातील संख्यांवर आधारित प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी उमेदवाराने गतिमान आकडेमोड करणे आवश्यक असते. त्यासाठी पाढे पाठ असणे, वर्ग, घनसंख्या यांचे पाठांतर असल्यास उमेदवाराला त्याचा निश्चितच फायदा होतो.
बुद्धिमत्ता चाचणी या घटकाची तयारी करण्यासाठी उमेदवाराने शालेय स्तरावरील स्पर्धा परीक्षांपासून सुरुवात करावी. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल. विविध परीक्षांच्या गतवर्षीच्या प्रश्नपत्रिकांचे अतिसूक्ष्म अवलोकन केल्यास ठराविक भागांवर प्रश्न विचारल्याचे आढळते. कोणत्याही उमेदवाराने प्रश्नांचा भरपूर सराव केल्यास तसेच अचूकतेवर भर देऊन वेळेचे नियोजन केल्यास या घटकावरील सर्व प्रश्नांची बरोबर उत्तरे देणे शक्य होईल.
बुद्धिमापन चाचणीचा निश्चित असा अभ्यासक्रम नसला तरी वर उल्लेख केल्याप्रमाणे विविध प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करून काही प्रमाणात अभ्यासक्रम ठरवता येतो. या घटकावरील प्रश्नांचे प्रामुख्याने दोन भाग पडतात. (१) शाब्दिक बुद्धिमत्ता (Verbal Reasoning) व (२) अशाब्दिक बुद्धिमत्ता (Non-Verbal Reasoning ). शाब्दिक बुद्धिमत्ता या प्रकारात सामान्य क्षमता चाचणी, अंकगणित, विश्लेषण क्षमता व तर्कशास्त्रीय युक्तिवाद यावर आधारित प्रश्न विचारले जातात, तर अशाब्दिक बुद्धिमत्तेमध्ये आकृत्यांवर आधारित प्रश्न विचारले जातात. प्रस्तुत अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे लक्षात घेता येतो.
शाब्दिक बुद्धिमत्ता
सामान्य क्षमता चाचणी : या विभागावर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांमध्ये पुढील घटकांचा समावेश होतो, हे लक्षात येते.

मालिका पूर्ण करणे. बुद्धिमत्ता चाचणी या घटकाची तयारी करण्यासाठी उमेदवाराने शालेय स्तरावरील स्पर्धा परीक्षांपासून सुरुवात करावी. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल. विविध परीक्षांच्या गतवर्षीच्या प्रश्नपत्रिकांचे अतिसूक्ष्म अवलोकन केल्यास ठराविक भागांवर प्रश्न विचारल्याचे आढळते. कोणत्याही उमेदवाराने प्रश्नांचा भरपूर सराव केल्यास तसेच अचूकतेवर भर देऊन वेळेचे नियोजन केल्यास या घटकावरील सर्व प्रश्नांची बरोबर उत्तरे देणे शक्य होईल.
बुद्धिमापन चाचणीचा निश्चित असा अभ्यासक्रम नसला तरी वर उल्लेख केल्याप्रमाणे विविध प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करून काही प्रमाणात अभ्यासक्रम ठरवता येतो. या घटकावरील प्रश्नांचे प्रामुख्याने दोन भाग पडतात. (१) शाब्दिक बुद्धिमत्ता (Verbal Reasoning) व (२) अशाब्दिक बुद्धिमत्ता (Non-Verbal Reasoning ). शाब्दिक बुद्धिमत्ता या प्रकारात सामान्य क्षमता चाचणी, अंकगणित, विश्लेषण क्षमता व तर्कशास्त्रीय युक्तिवाद यावर आधारित प्रश्न विचारले जातात, तर अशाब्दिक बुद्धिमत्तेमध्ये आकृत्यांवर आधारित प्रश्न विचारले जातात. प्रस्तुत अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे लक्षात घेता येतो.
शाब्दिक बुद्धिमत्ता





































अशा रीतीने, बुद्धिमत्ता चाचणीची तयार करण्यापूर्वी यात समाविष्ट होणाऱ्या विविध अभ्यासघटकांची ओळख करून घेणे महत्त्वाचे ठरते. मागील प्रश्नपत्रिकांच्या आधारेच ही माहिती संकलित करणे शक्य होते. म्हणूनच या लेखात प्रस्तुत चर्चा केली आहे. या आधारे आपल्या अभ्यासाची व्याप्ती ठरवून त्यातील एकेका घटकाची प्रभावीपणे तयारी करता येईल. त्यामुळे पुढील लेखात या घटकाची तयारी नेमकी कशी करायची? त्यासाठी कोणती अभ्यासपद्धती अवलंबायची याची चर्चा करणार आहोत.
No comments:
Post a Comment