Monday, September 3, 2012

‘एमपीएससी’चा राजमार्ग : मुख्य परीक्षा - सामान्य अध्ययन-४. ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान विकास’ घटकाची तयारी-३

‘एमपीएससी’चा राजमार्ग : मुख्य परीक्षा - सामान्य अध्ययन-४. ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान विकास’ घटकाची तयारी-३



कैलास भालेकर - शनिवार, २ जून २०१२
प्राध्यापक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.

kailasbhalekar@gmail.com

जैवतंत्रज्ञान क्षेत्राचा विकास भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विकासातील महत्त्वाचा टप्पा असून जैवतंत्रज्ञानाचे मानवी जीवनामध्ये सुधारणा घडवून आणण्याचे सामथ्र्य मोठे आहे. भारताच्या कृषी क्षेत्रातील प्रगतीसाठी जैवतंत्रज्ञान क्षेत्राचे योगदान मोठे आहे. भारताच्या कृषी क्षेत्रातील उत्पादकता आणि उत्पन्न वाढविणे ही आव्हानात्मक बाब असून जैवतंत्रज्ञानाची भूमिका त्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरते. जैवतंत्रज्ञानामध्ये अधिक उत्पादन असणारी, पाण्याचा ताण सहन करणारी आणि अधिक रोगप्रतिकारक क्षमता असणारे पिकांचे वाण विकसित करण्यासाठी संशोधन केले जात आहे. जैवतंत्रज्ञानाच्या उपयोजनाने पिकांची उत्पादकता वाढविण्याबरोबरच टिकाऊपणा आणि उपयुक्तता वाढविणे शक्य ठरते. भारताच्या कृषी क्षेत्रातील प्रगतीसाठी जैवतंत्रज्ञानाचा विकास आवश्यक असून जैवतंत्रज्ञान क्षेत्राच्या प्रगतीसाठी कार्यरत असणाऱ्या यंत्रणांची माहिती हा ‘जैवतंत्रज्ञान’ उपघटकाच्या तयारीतील महत्त्वाचा टप्पा ठरतो.
जैवतंत्रज्ञानाचे औद्योगिक उपयोजनदेखील महत्त्वाचे असून भारतातील जैवतंत्रज्ञान क्षेत्राने आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे. जैवतंत्रज्ञान उद्योगामध्ये संशोधन आणि विकास मोठय़ा प्रमाणात होत असून, आगामी कालावधीत जैवतंत्रज्ञान क्षेत्रामध्ये अधिक संधी निर्माण करण्याची जैवतंत्रज्ञान क्षेत्राची क्षमता मोठी आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेच्या विकासाचा रोजगारनिर्मिती हा महत्त्वाचा घटक आहे. जैवतंत्रज्ञान क्षेत्राची रोजगारनिर्मिती क्षमता आगामी कालावधीत खूपच महत्त्वाची ठरेल. जैवतंत्रज्ञानामुळे औद्योगिक क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊ शकतील. भारतामध्ये प्रशिक्षित मनुष्यबळाला मोठी संधी उपलब्ध होऊ शकेल. जैवतंत्रज्ञान उद्योगातील विविध प्रवाहांचे आकलन या घटकाच्या तयारीसाठी आवश्यक आहे. जैवतंत्रज्ञानातील महत्त्वाच्या संकल्पना समजून घेऊन त्यावर आधारित कशा प्रकारचे प्रश्न अपेक्षित आहेत याचा अंदाज घेऊन या घटकाची तयारी करता येते. जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील महत्त्वाच्या संकल्पनांचे आकलन विज्ञान-तंत्रज्ञानाच्या संदर्भपुस्तकांच्या साहाय्याने करता येते. तसेच, इंटरनेटवरदेखील यासंदर्भात माहिती उपलब्ध असते. इंटरनेटवरील माहितीचे संकलन करून त्याच्या नोट्स बनविल्यास जलद आणि सुलभरीत्या अभ्यास करणे शक्य होते.
जैवतंत्रज्ञानाचे अन्न तंत्रज्ञान क्षेत्रातदेखील उपयोजन आहे. त्यासंदर्भातील संशोधनातील महत्त्वपूर्ण बाबींचे अद्ययावत आकलन आवश्यक आहे. पर्यावरणदृष्टय़ा जैवतंत्रज्ञानाचे उपयोजन आणि पर्यावरणविषयक विकासासाठी जैवतंत्रज्ञान संशोधनाचे महत्त्वाचे टप्पे या बाबींचे आकलनदेखील महत्त्वाचे आहे. जैवतंत्रज्ञान क्षेत्राचा विकास ऊर्जानिर्मितीसाठीदेखील महत्त्वाचा असून, त्यासंदर्भातील प्रचलित घडामोडींचे संकलन या उपघटकाच्या तयारीसाठी उपयुक्त ठरेल. भारताच्या नसíगक साधनसंपत्तीच्या विकासासाठी जैवतंत्रज्ञान विकासाचे योगदान मोठे असून त्यासाठी शासनाद्वारे राबविलेले कार्यक्रम, योजना आणि कार्यरत असणाऱ्या यंत्रणांचा अभ्यास आवश्यक ठरतो. या बाबींच्या माहितीसाठी शासनाच्या वेबसाईटचा आणि ‘इंडिया इयर बुक’ या पुस्तकाचा संदर्भ घेता येतो.
‘जनुकीय अभियांत्रिकी’ या संकल्पनेच्या आकलनाबरोबरच जनुकीय अभियांत्रिकीचे उपयोजन कोणकोणत्या क्षेत्रात होते याची माहिती आवश्यक ठरते. जनुकीय अभियांत्रिकीची पशुसंवर्धन क्षेत्रामध्ये असलेल्या उपयोजनाचे संकल्पनात्मक आकलन महत्त्वाचे आहे. भारतामध्ये दुधाची उपलब्धता वाढविण्यासाठी पशुसंवर्धन महत्त्वाचे आहे. पशुसंवर्धनाची उत्पादकता वाढविण्यासाठी जनुकीय अभियांत्रिकीतील संशोधन महत्त्वाचे आहे. पशुसंवर्धन क्षेत्रात विशेषत: पशु-आरोग्य क्षेत्रात जनुकीय अभियांत्रिकी महत्त्वाची असून सद्य:स्थितीतील त्यासंदर्भातील विविध घडामोडींची वस्तुनिष्ठ माहिती मिळविणे गरजेचे ठरते.
‘अन्नसुरक्षा’ निर्माण करण्यासाठी अन्नधान्याचे उत्पादन वाढविणे आवश्यक ठरते. अन्नधान्याचे उत्पादन वाढविण्यासाठी अन्नधान्याच्या उत्पादकतेत वाढ महत्त्वाची ठरते. त्यादृष्टीने जनुकीय बदल घडविलेले अन्नधान्य हा एक महत्त्वाचा पर्याय ठरतो. जनुकीय बदल घडविलेले अन्न (जेनेटीकली मॉडीफाईड फूड) यामध्ये सध्या संशोधन होत असून, जनुकीय बदल घडविलेल्या अन्न उपयोजनासंदर्भात असणाऱ्या महत्त्वाच्या प्रवाहांचे आकलन आवश्यक आहे. जनुकीय बदल घडविलेले अन्न यासंदर्भात नियमनांची आवश्यकता आहे. तसेच जनुकीय बदल घडविलेले अन्न या संदर्भातील महत्त्वाच्या तंत्रज्ञानविषयक संकल्पनात्मक बाबींचे आकलन हादेखील या उपघटकाच्या तयारीतील महत्त्वाचा भाग ठरतो. जनुकीय अभियांत्रिकीद्वारे निर्मित पिकांच्या वाणांच्या विकासासाठी संशोधन होत आहे. जनुकीय अभियांत्रिकीच्या उपयोजनासंदर्भात विविध नियमने असून या नियमनांची आणि नियामक यंत्रणांची माहिती उपयुक्त ठरते.
जनुकीय उपचार (जीन थेरपी) यांसारख्या संकल्पनांचे आकलन आवश्यक असून जनुकीय उपचाराचे महत्त्व कोणते आहे? सध्या यासंदर्भात झालेल्या संशोधनांची माहिती मिळविता येते. या सर्व बाबींशी संबंधित समस्यांचे आकलन हा या उपघटकाच्या तयारीतील महत्त्वाचा भाग आहे. जनुकीय उपचारासंदर्भात आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडींचे आकलनदेखील उपयुक्त ठरेल. जैवतंत्रज्ञान विकासाशी निगडित नतिक, सामाजिक आणि कायदेशीर बाबींची माहिती मिळविताना संभाव्य परिणामांची माहिती मिळविणेदेखील उपयुक्त ठरते. या संदर्भातील शासकीय उपाययोजना, धोरणे आणि नियमने अद्ययावत माहितीचे संकलन उपयुक्त ठरेल.
जनुकीय अभियांत्रिकीद्वारे उत्पादित बियाणे आणि त्यांच्या गुणवत्ताविषयक आकलन महत्त्वाचे आहे. त्यासंदर्भातील अलीकडील कालावधीत महत्त्वपूर्ण प्रवाहांचा वेध घेणे गरजेचे ठरते. अर्थातच ही तयारी वस्तुनिष्ठ संदर्भासह करणे महत्त्वाचे आहे. बीटी कापूस, बीटी वांगे यांसारख्या बियाण्यांची माहिती आणि त्यासंदर्भातील महत्त्वाच्या धोरणांची माहिती मिळविता येते.
जैवतंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणाऱ्या शासनाच्या धोरणांची माहिती अद्ययावत संदर्भासह करणे आवश्यक ठरते. जैवतंत्रज्ञान घटकाच्या तयारीसाठी अद्ययावत संदर्भाच्या आकलनावर भर द्यावा लागतो.

No comments: