‘एमपीएससी’चा राजमार्ग - मुख्य परीक्षा : इंग्रजी अनिवार्य : संवाद कौशल्याची तयारी
अपर्णा दीक्षित, सुश्रुत रवीश ,गुरुवार, ५ एप्रिल २०१२
प्राध्यापक, द युनिक अॅकॅडमी, पुणे.
dixitaparna1@gmail.com
sushruth.ravish@gmail.com
या लेखामध्ये आपण संवादकौशल्यावर आधारित घटकाबद्दल चर्चा करणार आहोत. संवाद कौशल्य या घटकाबद्दल पाहिले तर यात ५ विषयांचा अंतर्भाव आहे.
* एखाद्या कार्यक्रमाबद्दल किंवा अधिकृत समारंभाबद्दल वरिष्ठांकडे अहवाल सादर करणे.
* नोटीस किंवा माध्यमांमध्ये (रेडिओ, टी.व्ही., वर्तमानपत्र) जाहीर करण्यासाठी अधिकृत पत्रक लिहिणे. * (अ) दोन व्यक्तींमधील संवाद किंवा दिलेल्या मुद्यांना धरून चर्चा.
(ब) भाषण समारंभामध्ये दिली जाणारी भाषणे (स्वागतपर, समारोपपर, उद्घाटन प्रसंगासाठी, कृतज्ञतापर) लिहिणे.
* एका व्यक्तीची गटाबरोबरची संभाषणे-
(अ)नोकरीच्या मुलाखतीच्या वेळी.
(ब)पत्रकार परिषदेमध्ये.
(क)प्रतिनिधिमंडळाबरोबर संवाद
(ड)एखाद्या उपक्रमाच्या ठिकाणी किंवा नसíगक आपत्ती ओढवली असेल अशा ठिकाणी लोकांबरोबरचा संवाद.
ल्ल गटचर्चा, बठकीदरम्यानचे संवाद, टेलीकॉन्फरन्सच्या (दूरध्वनीवरून अनेक जणांनी एकाच वेळेस संवाद साधणे) माध्यमातून साधलेला संवाद. या सर्व विषयांवर साधारण १००-१५० शब्दात लिहिणे अपेक्षित आहे. हे सर्व प्रसंग आपल्या सभोवतालामध्ये सहज घडणारे आहेत. त्यामुळे अशा प्रसंगांबद्दल १०-१५ वाक्ये लिहिता यावीत ही अपेक्षा रास्त आहे. अशा प्रकारचे संवादलेखन इंग्रजीमधून करताना काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.
जिथे-जिथे संवाद औपचारिक स्वरूपाचा असतो, तिथे अभिवादनांची आणि अशा प्रकारच्या संवादामध्ये वापरल्या जाणाऱ्या ठरावीक शब्दसमूहांची ओळख हवी. जसे की, गटचच्रेमध्ये दुसऱ्याचे मत पटल्याचे दर्शवणारी वाक्यं तसेच नोकरीच्या मुलाखतीसाठीच्या लिखाणामध्ये सुरूवातीला आणि शेवटी योग्य अभिवादनांचा समावेश करणे. उदाहरणार्थ, गटचच्रेमध्ये दुसऱ्या व्यक्तीने मांडलेल्या मुद्याला धरून आपले म्हणणे मांडत असतांना, I agree with your views and would like to add ..... अशा प्रकारे मांडणी करावी. किंवा एखाद्या व्यक्तीच्या विरुद्ध मत आपण मांडत आहोत, अशा वेळेस ते आदरपूर्वक सांगावे. उदा.I would like to differ with ..... या सर्वामधून विद्यार्थी विषयाशी सुसंगत मुद्यांबरोबरच स्वतच्या व्यक्तिमत्त्वाविषयी सकारात्मक भूमिका तयार करू शकतो. व असे करण्यासाठी भाषा हा महत्त्वाचा घटक आहे. मुलाखतीचे वर्णन लिहिताना Good Morning,Thank you अशा अभिवादनांचा वापर करायचे विसरू नये. औपचारिक संवादांवर आधारित नमुना प्रश्न :
(a) You are a participant in a group discussion.someone suggests that Annual Examination should be held in September/ October in spite of (sic)March/ April. Write in detail a script considering your views and expressions,interactions by other member on it, etc
अशा प्रश्नाचे उत्तर लिहितांना असा प्रस्ताव का मांडला जात आहे याची कारणीमीमांसा संवादाच्या माध्यमातून स्पष्ट करावी. संवाद/गटचर्चा लिहित असतांना ५-६ व्यक्तींपेक्षा अधिक व्यक्ती कल्पणे, लिखाणासाठी किचकट ठरू शकते. यामध्ये मतभेद तसेच पूरक मते दोन्ही प्रकारच्या संवादांचा समावेश असावा.
(b) You have been invited by a reputed college to give a speech on role of college in society. prepare notes on given topic as a source to deliver your views. .यामध्ये आपण भाषणाचे टिपण काढणार आहोत, हे ध्यानात ठेवून व्यासपीठावरील व्यक्तींना कसे संबोधणार आहोत याचा उल्लेख करावा. उदा. Honourable Principal, Respected Dignitaries and Dear Teachers, I am glad ....
मुद्यांची नोंद करत असताना त्याबरोबर उदाहरणाची देखील नोंद करावी.
अनौपचारिक संवादामध्ये (मित्र, पालक, सहाध्यायी) साध्या, सोप्या भाषेचा वापर करावा. व्यक्ती एकमेकांना जवळकीने संबोधत आहेत, असे दर्शवणारे संवाद लिहावेत. मर्यादित प्रमाणात विनोदी संवादांचा समावेश केल्याने लिखाण अधिक उठावदार होऊ शकते.
Q. Your family members are on picnic.While returning home father announces that they are visiting a zoo.Being a member of family write a dialogue taking into account-time,ticket,what to seem instructions etc.among the family members.
अशाप्रकारच्या संवादामध्ये एक प्रकारची सहजता असणे अपेक्षित आहे. जुन्या घटनांचा संदर्भ दिल्याने लिखाणात अनौपचारिकता सहज येते. जसे की, I really miss sister at this moment. Last time we went for picnic,she was with us. Hope she finishes college and joins us for next trip soon.
औपचारिक आणि अनौपचारिक, दोन्ही प्रकारचे संवाद लिहीत असताना ते प्रसंग डोळ्यासमोर उभे करणे, कल्पणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. भाषेचे दडपण न घेता अशाप्रकारचे संवाद प्रत्यक्षात कसे घडतील याचा बारकाईने विचार करणे आवश्यक आहे. अशा प्रकारच्या संवादलिखाणाची तयारी म्हणून इंग्रजी टी.व्ही. वाहिन्यांवर होणाऱ्या गटचर्चा पाहाव्यात. औपचारिक भाषेसाठी नाही तर उत्तर प्रत्युत्तर कसे दिले जाते याच्या निरीक्षणाकरता या माध्यमाचा उपयोग केला जाऊ शकतो. तसेच वृत्तपत्रे, मासिके यांमधून येणाऱ्या मुलाखती वाचणेदेखील फायद्याचे ठरू शकते. यांमध्ये प्रश्न विचारणाऱ्याची शैली, उत्तर देतांना वापरली जाणारी भाषा याचा अभ्यास करावा. तसेच उत्तर देणारी व्यक्ती एखाद्या मुद्यावर भर देण्यासाठी कोणत्या शब्दसमूहांचा वापर करते याचे निरीक्षण करावे. नसíगक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या व्यक्तीबद्दल सहानुभूती, स्वतच्या चुकीबद्दल दिलगिरी, दुसऱ्याच्या यशाबद्दल निखळ आनंद, पाल्याच्या भवितव्याची चिंता, प्रतिनिधिमंडळाबरोबर बोलतांना मुद्देसूदपणा या सर्व संवादांचे अनेकपदरीपण साध्या वापरातील इंग्रजीमधून सादर करता येणे, हे संवादकौशल्याचे खरे उद्दिष्ट आहे.
No comments:
Post a Comment