सुजित शि. पवार - सोमवार, १२ मार्च २०१२
प्राध्यापक, द युनिक अॅकॅडमी, पुणे.
admin@theuniqueacademy.com
सध्याच्या काळातील कोणत्याही स्पर्धा परीक्षेतील एक अविभाज्य घटक म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी. शालेय स्तरावरील स्पर्धा परीक्षा असो वा वेगवेगळय़ा अभ्यासक्षेत्रांत घेतल्या जाणाऱ्या प्रवेशपरीक्षा किंवा विविध क्षेत्रांतील अधिकारीपदांसाठी होणाऱ्या निवड परीक्षा असो, अशा परीक्षांमध्ये बुद्धिमत्ता चाचणीविषयक प्रश्न विचारले जातात.
प्राध्यापक, द युनिक अॅकॅडमी, पुणे.
admin@theuniqueacademy.com
सध्याच्या काळातील कोणत्याही स्पर्धा परीक्षेतील एक अविभाज्य घटक म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी. शालेय स्तरावरील स्पर्धा परीक्षा असो वा वेगवेगळय़ा अभ्यासक्षेत्रांत घेतल्या जाणाऱ्या प्रवेशपरीक्षा किंवा विविध क्षेत्रांतील अधिकारीपदांसाठी होणाऱ्या निवड परीक्षा असो, अशा परीक्षांमध्ये बुद्धिमत्ता चाचणीविषयक प्रश्न विचारले जातात.
परीक्षेला बसलेला उमेदवार विचारलेल्या प्रश्नांची किती लवकरात लवकर उत्तरे देऊ शकतो याची चाचणी घेतली जाते. उमेदवाराच्या बुद्धीचे मापन केला जाणारा कोणताही प्रश्न या घटकात विचारला जातो. राज्यसेवा पूर्वपरीक्षेत एकूण २०० प्रश्न विचारले जातात. यातील ५० प्रश्न बुद्धिमत्ता चाचणी यावर असतात. इतर कोणत्याही घटकापेक्षा या घटकावरील प्रश्नांची संख्या सर्वात जास्त असल्यामुळे या चाळणी परीक्षेत पास होण्यासाठी हा घटक निर्णायक ठरतो. प्रश्नांचा विचार केल्यास इतर कोणत्याही घटकापेक्षा बुद्धिमत्ता चाचणी या घटकावरील प्रश्न सोडविण्यासाठी तुलनेने जास्त वेळ लागतो. तो वेळ वाचविण्यासाठी विविध क्लृप्त्या, सूत्रे वापरणे व प्रश्न सोडविण्याचा सराव करणे गरजेचे असते. बुद्धिमत्ता चाचणी या घटकातील संख्यांवर आधारित प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी उमेदवाराने गतिमान आकडेमोड करणे आवश्यक असते. त्यासाठी पाढे पाठ असणे, वर्ग, घनसंख्या यांचे पाठांतर असल्यास उमेदवाराला त्याचा निश्चितच फायदा होतो.
बुद्धिमत्ता चाचणी या घटकाची तयारी करण्यासाठी उमेदवाराने शालेय स्तरावरील स्पर्धा परीक्षांपासून सुरुवात करावी. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल. विविध परीक्षांच्या गतवर्षीच्या प्रश्नपत्रिकांचे अतिसूक्ष्म अवलोकन केल्यास ठराविक भागांवर प्रश्न विचारल्याचे आढळते. कोणत्याही उमेदवाराने प्रश्नांचा भरपूर सराव केल्यास तसेच अचूकतेवर भर देऊन वेळेचे नियोजन केल्यास या घटकावरील सर्व प्रश्नांची बरोबर उत्तरे देणे शक्य होईल.
बुद्धिमापन चाचणीचा निश्चित असा अभ्यासक्रम नसला तरी वर उल्लेख केल्याप्रमाणे विविध प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करून काही प्रमाणात अभ्यासक्रम ठरवता येतो. या घटकावरील प्रश्नांचे प्रामुख्याने दोन भाग पडतात. (१) शाब्दिक बुद्धिमत्ता (Verbal Reasoning) व (२) अशाब्दिक बुद्धिमत्ता (Non-Verbal Reasoning ). शाब्दिक बुद्धिमत्ता या प्रकारात सामान्य क्षमता चाचणी, अंकगणित, विश्लेषण क्षमता व तर्कशास्त्रीय युक्तिवाद यावर आधारित प्रश्न विचारले जातात, तर अशाब्दिक बुद्धिमत्तेमध्ये आकृत्यांवर आधारित प्रश्न विचारले जातात. प्रस्तुत अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे लक्षात घेता येतो.
शाब्दिक बुद्धिमत्ता
सामान्य क्षमता चाचणी : या विभागावर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांमध्ये पुढील घटकांचा समावेश होतो, हे लक्षात येते.
मालिका पूर्ण करणे. बुद्धिमत्ता चाचणी या घटकाची तयारी करण्यासाठी उमेदवाराने शालेय स्तरावरील स्पर्धा परीक्षांपासून सुरुवात करावी. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल. विविध परीक्षांच्या गतवर्षीच्या प्रश्नपत्रिकांचे अतिसूक्ष्म अवलोकन केल्यास ठराविक भागांवर प्रश्न विचारल्याचे आढळते. कोणत्याही उमेदवाराने प्रश्नांचा भरपूर सराव केल्यास तसेच अचूकतेवर भर देऊन वेळेचे नियोजन केल्यास या घटकावरील सर्व प्रश्नांची बरोबर उत्तरे देणे शक्य होईल.
बुद्धिमापन चाचणीचा निश्चित असा अभ्यासक्रम नसला तरी वर उल्लेख केल्याप्रमाणे विविध प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करून काही प्रमाणात अभ्यासक्रम ठरवता येतो. या घटकावरील प्रश्नांचे प्रामुख्याने दोन भाग पडतात. (१) शाब्दिक बुद्धिमत्ता (Verbal Reasoning) व (२) अशाब्दिक बुद्धिमत्ता (Non-Verbal Reasoning ). शाब्दिक बुद्धिमत्ता या प्रकारात सामान्य क्षमता चाचणी, अंकगणित, विश्लेषण क्षमता व तर्कशास्त्रीय युक्तिवाद यावर आधारित प्रश्न विचारले जातात, तर अशाब्दिक बुद्धिमत्तेमध्ये आकृत्यांवर आधारित प्रश्न विचारले जातात. प्रस्तुत अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे लक्षात घेता येतो.
शाब्दिक बुद्धिमत्ता
सामान्य क्षमता चाचणी : या विभागावर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांमध्ये पुढील घटकांचा समावेश होतो, हे लक्षात येते.
समान संबंधांची जोडी पूर्ण करणे.
दिलेल्या घटकातील विसंगत घटक शोधणे.
सांकेतिक भाषेतील सांकेतिकीकरण व नि:सांकेतिकीकरणावरील प्रश्न. ’आकृत्यांमधील रिकाम्या जागा शोधणे.
वेन आकृत्यांचा वापर करून विविध घटकांतील परस्पर संबंध स्पष्ट करणे. ’आकृत्यांची (त्रिकोण, चौकोन, चौरस, आयात इ.) संख्या मोजणे.
दिशाबोध (दिशाज्ञान चाचणी).
नातेसंबंधांवर आधारित प्रश्न.
रांगेतील क्रम व मोजणी यांवरील प्रश्न.
दिनदíशका, घडय़ाळ, वय यांवरील प्रश्न.
तुलनेने अधिक काठिण्यपातळी असलेले कूट प्रश्न.
अंकगणित विषयक प्रश्न : राज्यसेवा पूर्वपरीक्षेत या विभागावर ५ ते ६ प्रश्न विचारले जातात. या प्रश्नांमध्ये उमेदवारास प्राप्त ज्ञानाचा व्यावहारिक उपयोग कशा प्रकारे करता येतो यावरील प्रश्नांचा समावेश होतो. त्यासाठी त्याला काही मूलभूत संकल्पनांची माहिती असणे गरजेचे असते. त्यावरून या विभागातील प्रश्नांमध्ये खालील घटकांचा समावेश होतो.
संख्यापद्धती : संख्यांची निर्मिती, संख्यांचे प्रकार, संख्यांवरील क्रिया- बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार.
अपूर्णाक : संकल्पना, त्यांचे प्रकार, तसेच त्यावरील शाब्दिक उदाहरणे.
वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ यांच्या संकल्पना व ते करण्याच्या गतिमान पद्धती.
शतमान व त्यावरील उदाहरणे, तसेच या घटकाशी संबंधित व्याज आणि नफा-तोटा यांवरील प्रश्न.
गुणोत्तर व प्रमाण : मूलभूत संकल्पनेवरील उदाहरणे व एकमान पद्धत, तसेच आलेखांवरील प्रश्नांमध्ये होणारा वापर.
काळ, काम, वेग, अंतर यांवरील प्रश्न, तसेच आगगाडय़ा व आगबोटींवरील प्रश्न.
शाब्दिक उदाहरणे (समीकरणांवर आधारित).
विश्लेषण क्षमता चाचणीत :उमेदवाराच्या विश्लेषण क्षमतेवर प्रश्न विचारले जातात त्यात पुढील उपघटकांचा समावेश होतो.
वर्गीकरण :दिलेल्या माहितीचे पृथक्करण करून त्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे.
तुलना : काही वस्तूंच्या विशिष्ट गुणधर्मानुसार दिलेल्या माहितीत योग्यक्रम लावणे.
बठक/आसन व्यवस्था : काही व्यक्ती अथवा वस्तूंची ओळीत किंवा वर्तुळाकार रचनेतील बठक व्यवस्थेबाबत. गोंधळून टाकणारी माहिती दिलेली असते. त्यांचा योग्य क्रम लावून प्रश्नांची उत्तरे देणे.
घटनाक्रम : एखाद्या ठिकाणी काही घटना ज्या क्रमाने घडल्या आहेत त्यांची ओबडधोबड माहिती दिलेली असते. त्यांचा योग्य क्रम लावून प्रश्नांची उत्तरे देणे.
निर्णयक्षमता : एखाद्या बिकट प्रसंगी उमेदवार प्रसंगावधानाने कोणता निर्णय घेऊ शकेल यावर आधारित प्रश्न.
तर्कशास्त्रीय युक्तिवाद : यात पुढील बाबी समाविष्ट होतात.
तर्क व अनुमान :यांमध्ये उमेदवारास विधानांमध्ये माहिती दिली जाते. ही माहिती पूर्णपणे सत्य मानून निष्कर्ष काढावयाचे असतात. त्यासाठी सायलोजिझम पद्धतीनुसार निष्कर्ष काढण्यावर प्रश्न विचारले जातात.
विधान-गृहीतके : यांमध्ये दिलेल्या विधानामागे दडलेल्या गृहीतकावर प्रश्न विचारले जातात. त्यावरून विधानासाठी कोणती गृहीतके अध्याहृत आहेत ते तपासण्यावर प्रश्न विचारले जातात.
विधान-विवाद : यात एका विषयासंदर्भात दोन मुद्दे मांडलेले असतात. त्या मुद्यांच्या पुष्टय़र्थ दिलेले कारण किती सबळ आहे यावर आधारित प्रश्न विचारले जातात.
अशाब्दिक बुद्धिमत्ता
मालिकापूर्ती :यात आकृत्यांची मालिका दिलेली असते. त्या मालिकेतील आकृत्यांतील संबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारी आकृती पर्यायांमधून शोधावयाची असते.
समान संबंध : यामध्ये चार आकृत्यांपकी कोणत्याही तीन आकृत्या दिलेल्या असतात. पहिल्या व दुसऱ्या आकृतीत जो संबंध असतो तोच संबंध तिसऱ्या व चौथ्या आकृतीत असतो. प्रथम दिलेल्या जोडीतील आकृत्यांमधील संबंध पाहावयाचा असतो. त्यानुसार प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती पर्यायांमधून निवडायची असते.
विसंगत आकृती शोधणे : यामध्ये काही आकृत्यांचा समूह असतो. त्यापकी एक आकृती सोडून इतर सर्व आकृत्यांमध्ये विशिष्ट समान गुणधर्म आढळतो. त्या गुणधर्मास अपवाद असणारी आकृती हे आपले उत्तर असते.
आरशातील प्रतिमा व जलप्रतििबब :एखादी आकृती आरशात कशी दिसेल अथवा तिचे पाण्यातील प्रतििबब कसे असेल यावर आधारित प्रश्न विचारले जातात.
अपूर्ण आकृती पूर्ण करणे : यामध्ये पूर्ण आकृतीचा काही भाग पर्यायांमधून शोधावयाचा असतो.
लपलेली आकृती शोधणे : यात पर्यायातील एक आकृती प्रश्नआकृतीत असते. ती शोधण्यावर प्रश्न विचारतात.
घन व सोंगटय़ावर आधारित प्रश्न मोठय़ा घनास रंगवून लहान घनात तुकडे करणे व सोंगटय़ांच्या स्थितींवर आधारित प्रश्न विचारले जातात.
अशा रीतीने, बुद्धिमत्ता चाचणीची तयार करण्यापूर्वी यात समाविष्ट होणाऱ्या विविध अभ्यासघटकांची ओळख करून घेणे महत्त्वाचे ठरते. मागील प्रश्नपत्रिकांच्या आधारेच ही माहिती संकलित करणे शक्य होते. म्हणूनच या लेखात प्रस्तुत चर्चा केली आहे. या आधारे आपल्या अभ्यासाची व्याप्ती ठरवून त्यातील एकेका घटकाची प्रभावीपणे तयारी करता येईल. त्यामुळे पुढील लेखात या घटकाची तयारी नेमकी कशी करायची? त्यासाठी कोणती अभ्यासपद्धती अवलंबायची याची चर्चा करणार आहोत.
No comments:
Post a Comment