नागेश गव्हाणे,
प्राध्यापक, द युनिक अॅकॅडमी, पुणे.
gavhanes@gmail.com
आज पंचायतराज व्यवस्था आणि भूगोल या घटकांच्या तयारीविषयी चर्चा केली जाणार आहे. महाराष्ट्रातील बहुतांश परीक्षार्थी ग्रामीण क्षेत्राशी संबंधित असल्यामुळे पंचायतराज हा घटक त्यांना परिचयाचा असतो.
त्यामुळे हा विषय सहजरीत्या समजून घेता येतो. पूर्व परीक्षेत हा घटक समाविष्ट करण्यामागील लोकसेवा आयोगाचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे यशस्वी झाल्यानंतर उमेदवाराला ज्या क्षेत्रामध्ये कार्य करावयाचे आहे (महसूल व विकासात्मक प्रशासन) त्या क्षेत्राचा इतिहास, ब्रिटिश कालखंड व स्वातंत्र्योत्तर कालखंडात झालेली जडणघडण, लोकशाही विकेंद्रीकरणाचे महत्त्व व त्याविषयक शासनाचे धोरण व उपाययोजना इ.चे आकलन वाढवणे हा आहे.
साधारणत: मागील प्रश्नपत्रिकेचा आढावा घेतल्यास लक्षात येते की एकूण ७-९ प्रश्नांपकी ५ ते ६ प्रश्न रचनात्मक स्वरूपाचे असून उर्वरित १ ते २ प्रश्न या विषयातील चालू घडामोडींशी संबंधित आहेत. त्यादृष्टीने मागील ५ प्रश्नपत्रिकांतील प्रश्नांचे प्रकरणनिहाय विश्लेषण पुढील तक्त्यात दिलेले आहे. या अनुषंगाने परीक्षार्थीना कोणकोणत्या उपघटकांचा अभ्यास करावा लागणार हे निश्चित करता येते.
राज्यसेवा पूर्वपरीक्षेत पंचायतराज घटकावरील काही प्रश्न पुढीलप्रमाणे-
(१)खालीलपकी ग्रामसभेशी संबंधित कोणते विधान बरोबर आहे?
(अ)मुंबई ग्रामपंचायत अधि. १९५८ कलम ६ अन्वये ग्रामसभेची तरतूद आहे.
(ब)ग्रामसभेच्या सदस्यांना ग्रामसभेचा अध्यक्ष होता येते.
(क)ग्रामसभेच्या आदल्या दिवशी महिलांची वेगळी सभा घेतली जाते.
(ड)सरपंच/उपसरपंचांच्या अनुपस्थितीत ग्रामसभा बोलावण्याचा अधिकार गटविकास अधिकाऱ्याकडे (बीडीओ) कडे आहे.
उपरोक्त तक्त्यातील माहिती आणि आयोगाने विचारलेले काही प्रश्न यांचा विचार केल्यास या घटकावर विचारल्या जाणाऱ्या एकूण ८-९ प्रश्नांपकी ५ ते ६ प्रश्न ग्रामीण स्थानिक संस्थांसंबंधी तर १-२ प्रश्न नागरी संस्थांसंबंधी विचारल्याचे दिसून येते. ७३व्या व ७४व्या घटनादुरुस्तीविषयी देखील एखादा प्रश्न विचारल्याचे लक्षात येते. त्याचप्रमाणे अलीकडील काळात महाराष्ट्र शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांविषयक कायदा आणि निवडणूकप्रक्रियेत केलेल्या बदलाविषयीदेखील प्रश्न विचारल्याचे दिसून येते. या सर्व बाबी लक्षात घेऊन ग्रामीण व नागरी स्थानिक स्वराज्य संस्था या घटकाची सर्वसमावेशक तयारी करण्यावर भर द्यावा. या संस्थांचा इतिहास, स्वातंत्र्योत्तर काळातील विकास व टप्पे, त्यासंबंधी नियुक्त केलेल्या समित्या व आयोग, प्रत्यक्षात भारतीय व राज्यपातळीवर निर्माण केलेली पंचायतराज व्यवस्था, ७३-७४व्या घटनादुरुस्ती नंतर त्यात झालेले महत्त्वपूर्ण बदल असे विभाग करून अचूक, नेमकी व अद्ययावत माहिती संकलित करावी. या संस्थांशी संबंधित प्रशासकीय प्रमुख व कार्यकारी प्रमुखांचा तौलनिक अभ्यास करावा. आवश्यक तेथे तक्ते, सारण्या आणि डायरीचा फॉर्म वापरून या घटकाची तयारी करावी.
भारताचा भूगोल (महाराष्ट्राच्या संदर्भात)
भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा भूगोल या उपघटकावर सर्वसाधारणपणे ६ ते ८ प्रश्न विचारण्यात येतात. यामध्ये जग, भारत व महाराष्ट्र अशी विभागणी दिसून येते. महाराष्ट्राच्या भूगोलाचा अभ्यास करताना महाराष्ट्राची प्राकृतिक रचना, हवामान, कृषी, वन, खनिजसंपत्ती, उद्योगधंदे, लोकसंख्या, आíथक भूगोल याविषयी प्रश्न विचारले जातात. यात पारंपरिक माहिती, चालू संदर्भ आणि सामान्यज्ञानासंबंधीही प्रश्न विचारलेले दिसतात. भारताच्या भूगोलावर विचारले जाणारे प्रश्न हे प्रामुख्याने भूगोलासंबंधीच, परंतु सामान्यज्ञानाचा संदर्भ असलेले दिसून येतात. उदा., क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा व छोटा जिल्हा कोणता?, भारतातील पहिला पर्यटन जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते? हे प्रश्न लक्षात घेऊन अशाच प्रकारे विचारल्या जाऊ शकणाऱ्या माहितीचा अभ्यास करावा. त्यासाठी तक्ते व कोष्टकांचा मोठय़ा प्रमाणात वापर करावा.
काही प्रश्न हे सामान्य भूगोल व जगातील भूगोलाविषयी विचारलेले दिसतात. या प्रश्नांचे स्वरूप सामान्यज्ञानावर आधारित असलेले दिसते. उदा., जगातील सर्वात जास्त भूकंपप्रवण क्षेत्र कोणते? कोणत्या देशाला मध्यरात्रीच्या सूर्याची भूमी म्हणतात? गुरू ग्रहाचे चार मुख्य उपग्रह कोणी शोधले. हा घटक अभ्यासताना भारतातील व महाराष्ट्रातील एखादा प्रदेश निवडून त्या प्रदेशाचे हवामान, प्राकृतिक स्वरूप, पर्जन्यमान, नद्या, मृदा, पीकपद्धती, खनिजे, उद्योग, दळणवळणाच्या सुविधा व इतर पायाभूत सुविधा, मानवी वस्ती, विविध क्षेत्रांत आढळणाऱ्या जाती-जमाती, शहरीकरणाचे प्रमाण आणि पर्यावरणविषयक घटकांची सर्वागीण तयारी करावी. अलीकडील काळात जागतिक तापमानवाढ, हवामानबदलाची समस्या, त्याविषयक राज्यीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुढाकार यावरदेखील प्रश्न विचारले जातात. त्याचप्रमाणे एखाद्या कारणामुळे एखादा प्रकल्प चच्रेत असल्यास त्याविषयक माहिती संकलित करून ठेवावी.
भूगोलाचा अभ्यास हा नकाशा वाचनाद्वारे अधिक रसपूर्ण व सुलभ बनविता येतो. त्यामुळे भूगोलातील प्रत्येक प्रकरण वाचताना समोर नकाशा असेल याची खबरदारी घ्यावी. आवश्यक तेथे कोऱ्या नकाशांचा वापर करून विविध स्वरूपाची माहिती त्यात भरून ठेवावी. नकाशा वाचन केवळ भूगोलासाठीच नव्हे तर चालू घडामोडींची तयारी करण्यासाठीदेखील अत्यंत उपयुक्त ठरते. विविध घटकासंबंधीची वस्तुनिष्ठ माहिती, सर्वात पहिले, सर्वात शेवटचे, नद्यांचे उगम, पर्वतांची उंची, घाटांची रचना, नद्याकाठची शहरे, जंगले, किल्ले, थंड हवेची ठिकाणे यांच्या याद्या व नकाशे तयार केल्यास अभ्यास अधिक काळ स्मरणात राहतो. विविध खाणी, उद्योगधंदे, रस्ते, लोहमार्ग, विमानमार्ग, शासनाचे नवे प्रकल्प यांसारख्या अनेक परीक्षाभिमुख माहितीचे एकत्रीकरण केल्यास प्रभावी पद्धतीने अभ्यास करता येईल आणि अभ्यासातील अचूकताही वाढविता येईल.
अ.क्र. समित्या वर्ष पर्याय
(१) भूषण गगराणी समिती (a) १९६० (अ) 1-b, 2-d, 3-a, 4-c
(२) बाबुराव काळे उपसमिती (b) १९९७ (ब) 1-d, 2-a, 3-c, 4-b
(३) व्ही.टी. कृष्णमचारी समिती (c) १९८८ (क) 1-c, 2-b, 3-a, 4-d
(४) पी. के. थंगन समिती (d) १९८० (ड) यापैकी नाही
अ.क्र. उपघटक २०११ २०१० २००९ २००८ २००७
(१) स्थानिक संस्थांच्या विकासाचे टप्पे - १ - १ -
(२) केंद्र व राज्य समित्या १ १ २ १ १
(3) ग्रामपंचायत व ग्रामसभा २ २ १ २ १
(४) पंचायत समिती २ १ १ १ १
(५) जिल्हा परिषद १ १ १ २ १
(६) नागरी स्थानिक संस्था १ १ १ १ १
(७) महसूल प्रशासन (तलाठी) - - - १ -
(८) पोलीस प्रशासन (पोलीस पाटील) - - - - १
(९) कायदे व योजना (७३ वी घटनादुरुस्ती) - १ १ - १
एकूण ७ ८ ७ ९ ७

No comments:
Post a Comment