महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम विविध सहा घटकांमध्ये विभागला आहे. अभ्यासासाठी आवश्यक श्रम व काठिण्यपातळीचा विचार करता कलाशाखा घटक हा इतर घटकांच्या तुलनेने सोपा ठरतो. पूर्वपरीक्षेत साधारणपणे या घटकावर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची संख्या ही ३०-३५ दरम्यान असते. स्वाभाविकच तुलनेने कमी श्रमात जास्त गुण देणारा घटक म्हणून कलाशाखा घटकाचा विचार करता येतो.
अर्थात यात सर्वच प्रश्नांची उत्तरे अचूक कशी देता येतील यावरच लक्ष असावे.
कलाशाखा घटकांतर्गत ‘भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास (१८५७-१९९०), महाराष्ट्रातील समाजसुधारकांचे कार्य, भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा भूगोल, भारतीय राज्यपद्धती, ग्रामप्रशासन हे पाच उपघटक येतात. प्रस्तुत लेखात पूर्वपरीक्षेसाठी ‘इतिहास व समाजसुधारक घटकांची तयारी कशी करावयाची’ याचा विचार करणार आहोत. पूर्वपरीक्षेचा विचार करता या घटकावर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची संख्या ही १०-१२ आहे हे लक्षात येते.
आधुनिक इतिहास
अभ्यासक्रमामध्ये इतिहास या घटकाचा उल्लेख ‘भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास- १८५७ ते १९९०’ असा आढळतो. या उल्लेखातून दोन महत्त्वाच्या बाबी स्पष्ट होतात. एक म्हणजे विषयाची एकंदर व्याप्ती व दुसरी म्हणजे इतिहासातील अभ्यासासाठीचा निर्धारित कालखंड.’ या घटकाचा अभ्यास करताना भारताचा इतिहास अभ्यासावा लागणार आहेच, पण त्यासोबत महाराष्ट्रातील घडामोडीही विशेषत्वाने अभ्यासाव्या लागतील. तसेच अभ्यासक्रमात जरी १८५७ ते १९९० असा कालखंड नमूद असला तरी काही वेळा १८५७ पूर्वीच्या घडामोडींवरदेखील प्रश्न विचारले जातात. त्यामुळे काही प्रमाणात त्या कालखंडातील काही घटकांची तयारी करावी लागते.
इतिहास या विषयावर प्रश्न विचारताना भारतातील युरोपीय सत्तांचे आगमन, ब्रिटिश सत्तेची स्थापना, ब्रिटिश प्रशासन, १८५७चा उठाव व अन्य शेतकरी, आदिवासी उठाव, सामाजिक-धार्मिक सुधारणा चळवळी, राष्ट्रवादाचा उदय, बंगालची फाळणी, असहकार, सविनय, भारत छोडो आंदोलन, आझाद िहद सेना, स्वातंत्र्यलढय़ाच्या काळातील वृत्तपत्रे, क्रांतिकारक चळवळी या घटकांवर साधारणपणे प्रश्न विचारले जातात. आधुनिक इतिहासातील महत्त्वाच्या घटनांनुसार वेगवेगळे टप्पे पाडावेत. त्यातील सुधारक व्यक्ती, संस्था, त्यांचे कार्य यांचा अभ्यास करावा. ब्रिटिश गव्हर्नर व व्हाइसरॉयची कारकीर्द, त्यांनी केलेली कामे, कायदे व त्यांच्या काळातील महत्त्वाच्या सामाजिक-राजकीय चळवळी इ. बाबींचे कोष्टक तयार करून बारकाईने अभ्यास करावा. त्याशिवाय स्वातंत्र्योत्तर काळातील संस्थानांचे विलीनीकरण, भाषावार प्रांतरचना, शिक्षण सुधारणा यावरही प्रश्न विचारले जातात. प्रश्नांची संख्या व रोख पाहिल्यास एक बाब लक्षात येते, की अभ्यासक्रमाचा आवाका जरी व्यापक असला तरी प्रामुख्याने १८५७ ते १९४७ याच काळातील घडामोडींवर जास्त भर दिलेला असतो.
इतिहास या घटकावर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचे स्वरूप कसे असते? साधे. यात बहुतांशी सर्वसाधारण स्वरूपाचे थेट प्रश्न विचारले जातात. उदा., ‘१८५७चे स्वातंत्र्यसमर’ ग्रंथाचे लेखक कोण? फॉरवर्ड ब्लॉक पक्षाची स्थापना कोणी केली? साताऱ्यामधील प्रतिसरकार कोणत्या चळवळीच्या काळात स्थापन झाले होते? आर्य समाजाचे संस्थापक कोण? आर्य समाजाची स्थापना कधी झाली? प्रश्नांचे एकंदर स्वरूप पाहिल्यानंतर असे दिसते की इतिहास या घटकावर फारच कमी प्रश्न संकल्पनात्मक अथवा विश्लेषणात्मक स्वरूपाचे असतात. प्रश्नांचे स्वरूप ‘वस्तुनिष्ठ’च असते. तथापि आधुनिक इतिहासातील पायाभूत संकल्पना व त्यांचे विश्लेषण याकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्यावी.
प्रश्नांच्या स्वरूपावरून आणखी एक बाब स्पष्ट होते, की दर परीक्षेमध्ये एखादाच प्रश्न तारीख, वर्ष अथवा सनावळय़ाबाबत विचारला जातो. अनेक विद्यार्थ्यांच्या मनात इतिहास म्हटले, की सनसनावळय़ांची भीती असते. प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण ही भीती दूर करण्यास सहायक ठरते. तारखांसंबंधी प्रश्न विचारतानाही १८५७चा उठाव, वंगभंग चळवळ, असहकार चळवळ, भारत छोडो आंदोलन, क्रांतिकारी संघटना, भारताची फाळणी इ. निवडक बाबींवर भर दिलेला दिसतो. सततच्या वाचनानंतर या तारखा व वष्रे आपोआप स्मरणात राहतात. त्यामुळे सनावळय़ांची अनाठायी भीती बाळगण्याची गरज नसते व नाही.
इतिहास विषयाचा अभ्यास करताना प्रथम या विषयातील प्रक्रिया समजून घेण्यावर भर द्यावा. त्यानंतर व्यक्ती, स्थल व काल या वस्तुनिष्ठ बाबींची तयारी करावी. विषयाची समज एकदा पक्की झाली की मग उरतात फक्त घटिते. त्यांचे सतत वाचन केले, की या विषयाची तयारी चांगली होते. जरी परीक्षेत प्राय: वस्तुनिष्ठ स्वरूपाची माहिती विचारली जात असली तरी अभ्यास करताना व्यापक स्वरूपात करण्यावर भर द्यावा. त्या माहितीस विश्लेषणाची जोड दिल्यास अभ्यास आनंददायी व यशदायी ठरतो. इतिहासाचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी ही दक्षता घ्यावी.
समाजसुधारक
महाराष्ट्रातील समाजसुधारकांची कामगिरी व प्रयत्न हा घटक तसा इतिहासाचाच एक भाग आहे, परंतु पूर्वपरीक्षेच्या अभ्यासक्रमात या घटकास स्वतंत्र स्थान दिले आहे. या घटकांतर्गत ब्रिटिश सत्तेची स्थापना झाल्यानंतर महाराष्ट्रात झालेल्या प्रबोधन प्रक्रियेवर प्रश्न विचारले जातात. संस्थात्मक प्रयत्नांबरोबरच मुख्यत: व्यक्तिगत प्रयत्नांवर भर दिला जातो.
पूर्वपरीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये कोणते समाजसुधारक महत्त्वाचे आहेत याची माहिती नाही अथवा त्यांचा नामोल्लेखही नाही. पण जुन्या प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणावरून महात्मा फुले, राजर्षी शाहूमहाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गोपाळ गणेश आगरकर, धोंडो केशव कर्वे, विठ्ठल रामजी िशदे, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी सतत प्रश्न विचारलेले आढळतात. त्याशिवाय जगन्नाथ शंकरशेठ, बाळशास्त्री जांभेकर, विष्णुशात्री पंडित, लोकहितवादी, न्यायमूर्ती रानडे, पंडिता रमाबाई, रमाबाई रानडे यांच्याविषयीही बऱ्याचदा प्रश्न विचारले जातात. त्यामुळे सर्व समाजसुधारकांची यादी तयार करून त्यात महत्त्वानुसार अग्रक्रम तयार करता येतो.
समाजसुधारकांचे प्रयत्न या घटकावर प्रश्न विचारतांना समाजसुधारकांचे जन्म व मृत्यू दिनांक, त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे प्रसंग, त्यांनी स्थापन केलेल्या महत्त्वाच्या संस्था, त्यांचे लेखनविषयक कार्य व त्यांचे वैचारिक विश्व यावर प्रश्न विचारले गेलेले दिसतात. उदा., ‘गुलामगिरी’ ग्रंथ कोणी लिहिला? चवदार तळे येथे कोणी, कधी, सत्याग्रह केला? वेदोक्त प्रकरण कधी घडले होते? लोकहितवादी म्हणून कोणत्या समाजसुधारकाचा उल्लेख केला जातो? इ. समाजसुधारकावरील प्रश्नांचे स्वरूप पूर्णत: वस्तुनिष्ठ असते. त्यामुळे समाजसुधारकाच्या घटकाचे एकदा, दोनदा सूक्ष्म वाचन झाले तर वस्तुनिष्ठ स्वरूपाची माहिती एकत्रित करून त्याची सतत रिव्हिजन करण्यावर विद्यार्थ्यांनी भर द्यावा. इतिहास व समाजसुधारक या घटकांच्या तयारीच्या दृष्टीने जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण हे या परीक्षेच्या तयारीतील महत्त्वाचे पाऊल आहे. प्रश्नांचे स्वरूप, प्रश्न विचारण्याची पद्धती, विषयात खोलवर जाण्याची आयोग, परीक्षकांची क्षमता या बाबी जशा विश्लेषणातून स्पष्ट होतात तशाच प्रकारे काही प्रश्न, काही काळानंतर परीक्षेमध्ये वारंवार विचारलेले आढळतात, त्या प्रश्नांची तयारी प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणामधून होईल. तसेच प्रश्न व एकंदर प्रश्नपत्रिकेत होणारे बदलही यातून लक्षात घेता येतात.
बाजारपेठेत या घटकांच्या तयारीसाठी विपुल संदर्भसाधने उपलब्ध आहेत. जास्तीत जास्त संदर्भसाधने वापरण्याऐवजी मोजकी परंतु अधिकृत, दर्जेदार संदर्भसाधने, त्यांचे सूक्ष्म व वारंवार केलेले पुनर्वाचन या घटकाच्या तयारीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. इतिहास या घटकाची तयारी करत असताना इयत्ता पाचवी व आठवी इयत्तांची बालभारती प्रकाशनाची पाठय़पुस्तके पायाभूत संदर्भ म्हणून उपयुक्त ठरतात. त्यानंतर डॉ. जयसिंहराव पवार यांच्या ‘िहदुस्थानच्या स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास’ या पुस्तकाचे वाचन करावे. त्याशिवाय ग्रोवर व बेल्हेकर लिखित ‘आधुनिक भारत’ या ग्रंथातील निवडक प्रकरणे अभ्यासावीत.
समाजसुधारक या घटकाच्या तयारीसाठी भिडे-पाटील यांनी लिहिलेले ‘महाराष्ट्रातील समाजसुधारणेचा इतिहास’ या पुस्तकाचा पायाभूत संदर्भ म्हणून आधार घ्यावा. त्याशिवाय ‘द युनिक अॅकॅडमी, पुणे यांनी प्रकाशित केलेल्या ‘महाराष्ट्र वार्षकिी संदर्भग्रंथातील ‘महाराष्ट्राचे शिल्पकार’ या प्रकरणाचा विशेष आधार घ्यावा. तसेच वृत्तपत्रात या समाजसुधारकांवर येणारे लेख, द युनिक अॅकॅडमी, पुणे यांनी राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी प्रकाशित केलेला विशेषांक हाही या घटकांच्या तयारीसाठी अत्यंत उपयुक्त आहे.’
इतिहास व समाजसुधारक या घटकांवर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची संख्या मर्यादित असते. प्रश्न तुलनेने सोपे असतात. त्यामुळे नेमक्या तयारीच्या बळावर या घटकातील प्रश्न पकीच्या पकी गुण देऊ शकतात. गरज आहे फक्त प्रश्नांचे स्वरूप समजून घेऊन नेमकी तयारी करण्याची.

No comments:
Post a Comment