‘एमपीएससी’चा राजमार्ग : मुख्य परीक्षा - सामान्य अध्ययन-४ : ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान विकास’ घटकाची तयारी - ४
कैलास भालेकर - सोमवार, ४ जून २०१२
प्राध्यापक, द युनिक अॅकॅडमी, पुणे.
kailasbhalekar@gmail.com
‘अणुऊर्जा’ भारताच्या ऊर्जा कार्यक्रमातील महत्त्वाचा घटक असून भारताच्या ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने अणुऊर्जा विकासाची महत्त्वाची भूमिका आहे. अणुऊर्जेचे सद्य:स्थितीतील महत्त्व कोणते आहे? अणुऊर्जेचे स्वच्छ ऊर्जास्रोत म्हणून काय महत्त्व आहे? यासारख्या बाबींच्या तयारीबरोबरच भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमांच्या महत्त्वाच्या टप्प्यांची तयारी करावी लागते. भारताच्या आण्विक धोरणाच्या वैशिष्टय़ांची माहिती आवश्यक आहे. त्यासंदर्भातील राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय महत्त्वपूर्ण घडामोडींचे आकलन आवश्यक आहे. आण्विक प्रसारबंदी कायदा (एन.पी.टी.), र्सवकष चाचणी बंदी करार (सी.टी.बी.टी.) यांसारख्या आंतरराष्ट्रीय करारांच्या महत्त्वाच्या तरतुदींच्या आकलनाबरोबरच भारताच्या या करारासंदर्भात असणाऱ्या भूमिकेबाबत माहिती आवश्यक ठरते. भारताच्या अणुचाचण्या पोखरण - १ (१९७४) आणि पोखरण - २ (१९९८) या संदर्भातील महत्त्वपूर्ण बाबींचे संकलन या घटकाच्या तयारीतील महत्त्वाचा भाग ठरतो.
भारत-अमेरिका अणुकरार २००९ मधील महत्त्वाच्या तरतुदींचे आणि प्रभावाचे वस्तुनिष्ठ आकलन महत्त्वाचे आहे. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा यंत्रणा यांसारख्या यंत्रणांची माहिती मिळविणे उपयुक्त ठरते. अणुऊर्जा प्रकल्पांची सुरक्षितता आणि अणुऊर्जा प्रकल्पांतील टाकाऊ पदार्थाची विल्हेवाट हा एक महत्त्वाचा घटक असून त्यासंदर्भातील विविध घडामोडींची आणि विविध उपाययोजनांची माहिती मिळविणे गरजेचे आहे. अणुऊर्जा आणि आण्विक धोरणांसंदर्भातील माहिती मिळविताना परीक्षेच्या वस्तुनिष्ठ स्वरूपाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
‘आपत्ती व्यवस्थापन’ या उपघटकाचा समावेश विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विकास या घटकांतर्गत करण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापनाची व्याख्या, स्वरूप आणि आपत्तीचे वर्गीकरण या बाबींची तयारी हा आपत्ती व्यवस्थापन उपघटकाच्या तयारीतील महत्त्वाचा भाग ठरतो. आपत्ती व्यवस्थापनासाठी कार्यरत असणाऱ्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची रचना आणि कार्यपद्धती यांची माहिती मिळविणे आवश्यक ठरते.
आपत्ती व्यवस्थापनाची आवश्यकता कोणती आहे? आपत्ती व्यवस्थापनामध्ये कोणत्या बाबींचा समावेश होतो? यांसारख्या बाबींच्या तयारीवर भर द्यावा लागतो. पूर, भूकंप, सुनामी, दरड कोसळणे यांसारख्या नसíगक आपत्तींचे स्वरूप आणि या नसíगक आपत्तींसाठीच्या महत्त्वाच्या कारणांचे आकलन आवश्यक ठरते. या नसíगक आपत्तींचा प्रभाव नेमका कोणत्या ठिकाणी अधिक आहे? नसíगक आपत्तींच्या धोक्यांच्या पूर्वसूचनांची आवश्यकता आणि धोक्यांच्या पूर्वसूचना मिळविण्याचे तंत्र या बाबतीतील अद्ययावत संदर्भासह तयारी महत्त्वाची आहे. नसíगक आपत्तीच्या धोक्यांची पूर्वसूचना देण्यासाठी कार्यरत असणाऱ्या भारतातील यंत्रणांची आणि या यंत्रणांच्या कार्यपद्धतीच्या माहितीचे संकलन महत्त्वाचे आहे. नसíगक आपत्तीची तीव्रता कमी करण्यासाठीच्या विविध उपाययोजना कोणत्या आहेत? त्या उपाययोजनांवर कोणत्या बाबींचा प्रभाव पडतो यांसारख्या बाबींचे आकलनदेखील ‘आपत्ती व्यवस्थापन’ उपघटकाच्या तयारीसाठी महत्त्वपूर्ण ठरते.
‘आपत्ती व्यवस्थापन’ या उपघटकामध्ये काही केस स्टडीजचा देखील समावेश केला आहे. अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट असणाऱ्या केस स्टडीजचा अभ्यास अत्यंत नेमकेपणाने आणि सूक्ष्मरीत्या करण्याची आवश्यकता आहे. केस स्टडीजमध्ये किल्लारी भूकंप (१९९३), भूज भूकंप (२००१), सिक्कीम-नेपाळ भूकंप (२०११) या भूकंपांचा समावेश आहे. या केस स्टडीजचा अभ्यास करण्यासाठी इंटरनेटवरील माहिती फायदेशीर ठरेल. इंटरनेटवरून या माहितीच्या नोट्स नेमकेपणाने संकलित करणे गरजेचे आहे. या माहितीवर आधारित कोणत्या प्रकारचे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न विचारले जाऊ शकतात, या संभाव्य स्वरूपाच्या साहाय्याने केलेला अभ्यास उपयुक्त ठरतो. काही महत्त्वाचे संदर्भ कायम अभ्यासण्याची आवश्यकता असल्याने छोटय़ा डायरीतील नेमक्या नोट्स रिव्हिजनसाठी फायदेशीर ठरतात. अर्थातच, केस स्टडीजचा अभ्यास अत्यंत उपयोजित स्वरूपात आणि संकल्पनांच्या आधारे करावा लागतो. उदा., भूकंपासंदर्भातील केस स्टडीजचा अभ्यास करताना रिश्टर प्रमाण यांसारख्या संकल्पनेचे आकलन आवश्यक ठरते.
बँदा ऑके (२००४) मधील सुनामीची आपत्ती आणि २०११ मधील फुकुशिमा भूकंप आणि सुनामीची आपत्ती या आंतरराष्ट्रीय स्तरावरील नसíगक आपत्तींचा समावेशदेखील अभ्यासक्रमात करण्यात आला आहे. या नसíगक आपत्तींचे स्वरूप समजावून घेण्यासाठी आपत्तीशी निगडित महत्त्वाच्या संकल्पना उदा. सुनामी म्हणजे काय? समजावून घेणे महत्त्वाचे ठरते. फुकुशिमा नसíगक आपत्तीमध्ये झालेल्या आण्विक अपघाताच्या माहितीचे संकलनदेखील महत्त्वाचे आहे. आण्विक अपघाताची कारणे अणुभट्टय़ांच्या संदर्भाबरोबरच सुनामी आणि भूकंपाच्या आपत्तीसंदर्भात करणेदेखील गरजेचे आहे. तसेच, आपत्तीची तीव्रता कमी करण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचे नेमके आकलन महत्त्वाचे आहे.
२००५ मधील मुंबईमधील पुराचा नसíगक आपत्तीच्या केस स्टडीचा समावेश अभ्यासक्रमात असून, मुंबईतील २००५मधील पुरासाठी कोणते घटक कारणीभूत ठरले? पुराची तीव्रता वाढण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या नेमक्या घडामोडींची माहिती मिळविण्याबरोबरच तीव्रता कमी करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती महत्त्वाची आहे. पुरामुळे झालेली हानी, आपत्ती व्यवस्थापनामधील त्रुटी आणि भविष्यामध्ये अशा आपत्ती होऊ नयेत यासाठी केलेल्या उपाययोजना आणि यंत्रणा यांची नेमकी माहितीदेखील महत्त्वाची आहे. महाराष्ट्रातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि पुराच्या धोक्याची पूर्वसूचना देणारी यंत्रणा, हवामान अंदाज यंत्रणा आणि समन्वय यंत्रणा या बाबींच्या तयारीवर भर देणे उपयुक्त ठरेल. डिसेंबर १९९३, जून २००६, नोव्हेंबर २००९ मध्ये झालेल्या बाँबहल्ला आणि २०११ मधील बाँबहल्ला आणि दहशतवादी हल्ला या आपत्तींच्या केस स्टडीज अभ्यासणे आवश्यक आहे. या केस स्टडीजचा अभ्यास अत्यंत नेमकेपणाने करण्याची गरज असून बाँबहल्ल्यामुळे आणि दहशतवादी हल्ल्यामुळे झालेली हानी अभ्यासणे आवश्यक ठरते. या प्रकारचे हल्ले रोखण्यासंदर्भातील उपाययोजना आणि यंत्रणा यांचा अभ्यास आवश्यक ठरतो.
विज्ञान आणि तंत्रज्ञान विकास घटकाचा अभ्यास करताना संकल्पनांच्या आकलनाबरोबरच नेमक्या उपयोजित संदर्भावर भर देणे उपयुक्त ठरते.
No comments:
Post a Comment